

Jharkhand Protest: झारखंडच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तसंच इतर स्पर्धापरीक्षांमधील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी रांची इथं सध्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनानं सोमवारी उच्चांक गाठला.पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला, बॅरिकेट्ही लावावे लागले काही ठिकाणी पाण्याचे फवारे देखील मारले गेले. यापार्श्वभूमीवर झारखंडच्या सोरेन सरकारवर दिवसागणिक दबाव वाढत चालला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारनं एक मोठी कारवाई करत एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
या परीक्षांच्या घोटाळ्यांची चौकशी सध्या सीआयडी करत असून सीआयडीनं जेपीएससीचे (झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन) माजी अध्यक्ष एल. ख्यांग्ते यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीआयडीकडून अद्यापपर्यंत झालेली ही २० वी अटकेची कारवाई आहे. यापूर्वी सीआयडीच्या उपपरीक्षा नियंत्रकासह १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांग्ते यांनी २२ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एल. खियांग्ते यांनी २८ जुलैपासून अनेकदा चौकशी करण्यात आली होती. तसंच काल, रविवारी जेपीएससीच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी अजिता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद यांचे राजीनामे स्विकारले होते.
राज्यातील विविद स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्यांचा तपास सीबीआयकडून व्हावा यासाठी आंदोलक ठाम आहेत. तसंच या प्रकरणात आता ईडीची देखील एन्ट्री झाली आहे. ईडीनं या परीक्षा घोटाळ्यांमध्ये १०० कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार झाल्याचा दावा करत याची चौकशी सुरु केली आहे.
जेएसएससी-सीजीएल परीक्षेसह झारखंडमधील इतर भरती परीक्षांमधील घोटाळ्यांशी संबंधित आर्थिक प्रकरणांची चौकशी ईडी करत असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ईडीनं झारखंड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीनं दाखल एफआयसह काही इतर तक्रारींची देखील दखल घेतली आहे. ईडीनं पीएमएलए कायद्यांतर्गत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
त्यातच आता परीक्षांमधील कथित घोटाळ्यांशी संबंधित विविध मागण्यांसह विरोध करणाऱ्या हजारो परीक्षार्थींनी सोमवारी झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चा काढला आहे. आंदोलक एकानंतर एक बॅरिकेट्स ओलांडून पुढे गेले त्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि लाठीचार्ज केला. गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले झारखंड लोकशाही क्रांतीकारी मोर्चाचे (जेएलकेएम) नेते देवेंद्रनाथ महंतो हा रुग्णालयात बसून या मोर्चामध्ये सहभागी झाले.
विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रतिमा हातात घेऊन आंदोलनस्थळी दिसले. उपोषणामुळं त्यांचं १०.५ किलो वजन घटलं आहे. त्यांनी यावेळी शांततापूर्ण आंदोलनाचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी हातात जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करावी किंवा त्याची सीबीआयद्वारे चौकशी करावी असे पोस्टर हातात घेतले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी म्हटलं की, भले ही आम्ही विधानसभेपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.