गुलाबरावांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी लाजून हसल्या अन् म्हणाल्या...

गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते बनवल्याचे वक्तव्य केलं होतं.
Hema Malini

Hema Malini

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल २४ तासांच्या आत माफी मागावी लागली आहे. आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर आता खासदार हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका वृत्तसंस्थेने हेमा मालिनी यांना या वक्तव्याबाबत विचारले तेव्हा सुरूवातीला त्या हसल्या अन् आपल्या गालाला हात लावत म्हणाल्या की, 'मी माझे गाल सुरक्षित ठेवायला हवेत.' पुढे त्या म्हणाल्या, हा गंमतीचा भाग सोडून द्या. पण हा ट्रेंड लालूजींनी काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. त्यानंतर ही गोष्ट प्रत्येकासाठी एक सर्वसाधारण बाब झाली. त्यांनाही असंच काही वाटलं असेल. सर्वजण असंच बोलत आहेत. पण असं करायला नको, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

सर्वसामान्य लोक असं म्हणत असतील तर ते आपण समजून घेऊ शकतो. पण खासदार किंवा संविधानिक पदावरील लोक असं म्हणत असतील तर ते योग्य नाही. अशा पध्दतीने महिलांविषयी बोलू नये, अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी पाटील यांच्यासह असं बोलणाऱ्यांचा समाचार घेतला.

<div class="paragraphs"><p>Hema Malini</p></div>
कट्टर विरोधक असलेल्या भाजप सरकारला काँग्रेसचा पाठिंबा अन् टीकेचा भडिमार

कधी काळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu prasad yadav) बिहारमधील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचे म्हणत होते. मात्र त्यांचीच स्टाईल गुलाबराव पाटील यांनी नुकतीच बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत बोलताना कॉपी करण्यचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते की, "गेली ३० वर्षे या भागातले आमदार आहेत. पण ते साधे रस्ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत."

या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर गुलाबराव पाटील चांगलेच वादात सापडले होते. या वक्तव्यावरून भाजपचे नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण पोलिस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही, अशी टीका वाघ यांनी केली होती. तसेच तात्काळ गुन्हा दाखल करा, नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला होता.

<div class="paragraphs"><p>Hema Malini</p></div>
परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या घरात सापडलं मोठं घबाड

त्यापाठोपाठ राज्य महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. 'एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरुपाशी करणे, हे संस्कार आणि ही संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे,' आपण महिलांना दुय्यम वागणूक देत आहात, हे चुकीचे आहे. त्यामुळे आपण केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा चाकणकर यांनी दिला होता.

त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी म्हटले आहे की, चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्या वक्तव्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे, तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com