Supreme Court news : सुप्रीम कोर्टाचा निकाल काँग्रेस नेत्याच्या बाजूने; अटक करण्यासाठी ‘फिल्डींग’ लावलेल्या मुख्यमंत्र्यांना धक्का…

Pawan Khera anticipatory bail : पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंगी भूईया यांच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचा तसेच विदेशात संपती असल्याचा आरोप केला होता.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP legal battle : आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यातच काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीविरोधात धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यावरून खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून खेडा हे गायब आहेत. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने खेडा यांना दिलासा दिला आहे.

पवन खेडा यांना अटक करण्यासाठी आसाम पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरावर धाड टाकली होती. पण तिथे खेडा सापडले नाही. त्यानंतर काही तासांत खेडा यांनी तेलंगणा हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. तिथे जामीन मंजूर झाला. पण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने जामिनाला स्थगिती देत गुवाहाटी हायकोर्टात जाण्यास सांगितले. या कोर्टाने जामीन फेटाळला.

खेडा यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. कोर्टाने शुक्रवारी सकाळी निकाल देत खेडा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेडा यांच्यासाठी हा मोठा दिलासा असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

Supreme Court
Farmer ID registration : शेतकऱ्यांनो, तातडीने काढा ‘फार्मर आयडी’; कृषि योजनांपासून राहावे लागेल वंचित, 'त्या' 40 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचे नाव आहे का?

काय आहे प्रकरण?

पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत सरमा यांच्या पत्नी रिंगी भूईया यांच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचा तसेच विदेशात संपती असल्याचा आरोप केला होता. ऐन निवडणुकीत या आरोपांनी खळबळ उडवून दिली. सरमा पती-पत्नीने हे आरोप फेटाळून लावत पोलिसांत तक्रार केली. रिंकी भूईया यांच्या तक्रारीनुसार खेडा यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच आसाम पोलिसांकडून खेडा यांना अटक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण खेडा त्यांच्या हाती लागले नाही. आज सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन देताना म्हटले की, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य सहजपणे धोक्यात टाकले जाऊ शकत नाही.

Supreme Court
Priyanka Chaturvedi news : विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे; प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी…

दोन्ही बाजूने (खेडा आणि सरमा पती-पत्नी) आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत, याची आम्हाला जाणीव आहे पण कोणाच्याही स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने खेडा यांना जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने खेडा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशातही जाता येमार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com