Supreme Court: गोवंश हत्या बंदीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; खंडपीठानं नेमकं काय म्हटलं?

तमिळनाडूमध्ये गोवंश हत्या बंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिली आहे.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : तमिळनाडूमध्ये गोवंश हत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. गोवंश हत्या हा इस्लाम धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचं नमूद करीत बकरी ईद किंवा इतर कोणत्याही दिवशी तमिळनाडूमध्ये गाय किंवा वासरांच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने २७ मे रोजी दिला होता. या आदेशाला तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Supreme Court
Triple Murder Case : मोबाईल सीडीआर, फास्टॅगमुळे शंकर मस्केचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन फसला; पोलिसांनी बांगलादेश सीमेवरच पकडले

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना त्यात दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाने या प्रकरणी मूळ याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली असून पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Supreme Court
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीला आव्हान! राष्ट्रवादीतूनच 'या' नेत्यानं घेतला कायदेशीर आक्षेप

तमिळनाडूच्या १९५८चा तमिळनाडू प्राणी जतन कायद्यानुसार दहा वर्षांपेक्षा जास्त वयाची गाय किंवा प्राणी शेतीकामासाठी अथवा प्रजननासाठी उपयुक्त नसेल, तर आवश्यक ते सरकारी प्रमाणपत्र घेऊन त्याची अधिकृत कत्तलखान्यात कत्तल करण्यास कायदेशीर परवानगी आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाचा सरसकट बंदीचा निर्णय या मूळ कायद्याच्या विरोधात जाणारा आहे, असा युक्तिवाद तमिळनाडू सरकारने केला. तमिळनाडू सरकारच्यावतीनं ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली.

Supreme Court
Anuradha Paudwal: 'विश्वगुरु... विश्वगुरु' म्हणणं बंद करा! प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी मोदी सरकारला जोरदार सुनावलं

जुना नियम लागू

उच्च न्यायालयाने आपल्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जात संपूर्ण राज्यासाठी सरसकट आणि कायमस्वरूपी बंदीचा दिलेला आदेश कायदेशीर चौकटीत बसणारा नाही, हा सरकारचा दावा सर्वोच्च न्यायालयानं तूर्तास मान्य केला आहे. या स्थगितीमुळं पुढील आदेशापर्यंत तमिळनाडूमध्ये जुना कायदेशीर नियम लागू राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com