वानखेडे अनुसूचित जातीतीलच! राष्ट्रीय आयोगाच्या उपाध्यक्षांची क्लिनचिट

नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे.
Arun Haldar
Arun HaldarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात आता समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी क्लिनचिट दिली आहे.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला आहे. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली आहे. हलदर म्हणाले की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

मलिकांनी सार्वजनिक केलेल्या निकाहनाम्याविषयी बोलताना समीर वानखेंडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे म्हणाले होते की, निकाहनामा उर्दूमध्ये आहे. मला उर्दू वाचता येत नाही. इंग्रजीतील सही मात्र खरी आहे. हा निकाह झाला आहे. पण काही कारणांनी त्यांनी घटस्फोट घेतला. हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. नवाब मलिकांनी कुणाच्याही खासगी आयुष्यात डोकावू नये. हे अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात मी न्यायालयातही जाऊ शकतो.

Arun Haldar
नवाब मलिकांनी सांगितलेला निघाला दुसराच किरण गोसावी!

समीर वानखेडे यांनी आपला विवाह मुस्लिम पध्दतीने व्हावा, अशी आईची इच्छा होती, असा दावा केला होता. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, मी जन्माने हिंदू असून दलित कुटूंबातील आहे. मी आजही हिंदू आहे. मी कधीही धर्मांतर केलेले नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून त्याचा मला अभिमान आहे. माझे वडिल हिंदू आहेत तर आई मुस्लिम होती. माझं दोघांवरही प्रेम करतो.

Arun Haldar
परमबीरसिंहांचा पाय खोलात; कधीही होऊ शकते अटक!

माझं लग्न मुस्लिम पध्दतीने व्हावं, अशी आईची इच्छा होती. त्याच महिन्यात माझ्या लग्नाची नोंदणी विशेष विवाह कायद्यांतर्गत केली. कारण जेव्हा दोन वेगळ्या धर्मातील लोक लग्न करतात, त्यावेळी या कायद्यांतर्गत नोंदणी होते. त्यानंतर आम्ही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी जर धर्मांतर केले असेल तर मलिकांनी तसे प्रमाणपत्र दाखवावे, पुरावा दाखवावा. माझे वडील विशेष कायद्यांतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवतील, असंही वानखेडे यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com