TET Exam : शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका : राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल; विधानसभेत प्रस्ताव पारित करत तामिळनाडूची केंद्राला विनंती

TET Exam For Teachers Latest News : तमिळनाडू सरकारने दीर्घकाळ सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला असून, 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TETमधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.
Tamil Nadu TET Exam For Teachers
Tamil Nadu TET Exam For Teacherssarkarnama
Published on
Updated on

Teachers News : तमिळनाडूतील मुख्यमंत्री थलपती विजय सरकारने राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सरकारी शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या विधानसभेत सरकारने अशा शिक्षकांना ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) उत्तीर्ण होण्याच्या अटीतून ‘पूर्ण आणि कायमस्वरूपी’ सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव पारित केला आहे. तर तो केंद्राकडे पाठवत यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला आहे.

तामिळनाडू विधानसभेने दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या हितासाठी पाऊल उचलत, २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देणारा ठराव पास केला आहे. तर विधानसभेने केंद्र सरकारला शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २३ मध्ये आवश्यक कायदेशीर सुधारणा करण्याचे आणि एनसीटीई (NCTE) मार्फत स्पष्ट निर्देश जारी करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी ठराव मांडला. तसेच, त्यावेळच्या लागू नियमांनुसार आणि पात्रतेनुसार या शिक्षकांना पूर्ण आणि कायमस्वरूपी शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) सूट देण्यात यावी, असे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारला केलेल्या आवाहनात जवळपास २० वर्षे अविरतपणे सेवा देणाऱ्या आणि सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यास भाग पाडणे हे त्यांच्या उपजीविकेच्या हक्कावर थेट परिणाम करणारे आहे.

Tamil Nadu TET Exam For Teachers
TET Exam: TET सक्तीविरोधात शिक्षक आमदार एकवटले; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्राकडं कायद्यात बदलाची मागणी

तसेच, या शिक्षकांना सूट देण्यासाठी ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९’ (RTE Act) मधील कलम २३ मध्ये सुधारणा करावी, अशी विनंती केली आहे. तसेच, ‘राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे’द्वारे (NCTE) याबाबत स्पष्ट अधिकृत अधिसूचना किंवा परिपत्रक जारी करावे, अशी मागणीदेखील यावेळी तामिळनाडू सरकारने केली आहे.

Tamil Nadu TET Exam For Teachers
TET Exam Date: TET पेपर फुटीला 3 महिने उलटले; परीक्षा कधी होणार? लाखो उमेदवार संभ्रमात

याचवेळी, दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांना नोकरीची सुरक्षितता, पदोन्नती आणि रोजगाराशी संबंधित सर्व लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळत राहावेत. अशा शिक्षकांच्या हिताचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेदेखील आवाहन तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com