

N Chandrashekharan: टाटा समुहामध्ये गेल्या काही वर्षांपासून नेतृत्वावरुन बराच गोंधळ सुरु असल्याचं चित्र आहे. यापूर्वी दिवंगत रतन टाटा यांनी तब्बल २६ वर्षे नेतृत्व केल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सायरस मिस्त्री यांची निवड झाली होती. पण रतन टाटा यांनीच त्यांना नंतर या पदावरुन दूर केलं. त्यानंतर ही जबाबदारी नटराजन चंद्रशेखरन यांच्या खांद्यावर आली. पण आता त्यांनीही अचानक कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळं देशभरात एकच खळबळ उडाली असून शेअर मार्केटवरही याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला.
देशातील सर्वात मोठा उद्योग समुह असलेल्या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते या जबाबदारीवर कायम असणार आहेत. येत्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. चंद्रशेखरन यांनी २०१७ मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा कारभार हाती घेतला होता. टाटा कुटुंबाच्या बाहेरचे ते पहिले प्रोफेशनल मॅनेजर होते, त्यांच्या खांद्यावर टाटा समुहाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, टाटा ट्रस्टमध्ये काही मतभेद निर्माण झाल्यामुळं एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांच्या नेृत्वखाली टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनी अनौपचारिकरित्या चंद्रशेखरन यांना संचालक म्हणून पुन्हा नॉमिनेट न करण्याचा आणि टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. टाटा ग्रुपच्या एका वरिष्ठ संचालकानं सांगितंल की, या निर्णयाला १३ ऑगस्ट रोजी टाटा ट्रस्टच्या बैठकीत औपाचारिक स्वरुप दिलं जाणार होतं.
यानंतर आता पुढील सहा महिन्यांत टाटा ग्रुपवला चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकारी शोधावा लागेल. टाटा ग्रुपच्या एका सुत्रांनी सांगितलं की, ग्रुप उत्तराधिकाऱ्यासाठी ग्रुपच्या आतील आणि बाहेरच्या लोकांपैकी कोणाचा तरी विचार होऊ शकतो. चंद्रशेखरन हे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस आणि इंडियन हॉटेल्स यांसारख्या अनेक मोठ्या टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे देखील ते चेअरमन होते. या सर्व कंपन्यांना २०२७ पर्यंत नवा चेअरमन मिळून जाईल.
चेअरमन म्हणून चंद्रशेखरन यांचा कार्यकराळ फेब्रुवारी २०१७ रोजी सुरु झाला होता. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांना पुन्हा एक्स्टेंन्शन देण्यात आलं होतं. दरम्यान, १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेअरहोल्डर्सकडून चंद्रशेखरन यांची संचालक म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण विश्वस्तांना त्यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या विरोधात होते त्यामुळं चंद्रशेखरन यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.