DCM Plane Glitch: उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात झाला बिघाड! धूर निघायला लागल्यानं झाली इमर्जन्सी लँडिंग

या घटनेनंतर तात्काळ एअरपोर्ट प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीज सक्रीय झाल्या त्यानंतर विमान रनवेवरच थांबवण्यात आलं आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
plane file photo
plane file photo
Published on
Updated on

DCM Plane Glitch: सरकारी विमानात सोमवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळं मुरादाबाद विमानतळावर काही काळ खळबळ माजली होती. विमान रनवेवर असनाच अचानक त्याचं एक इंजिन बंद पडलं. इंजिनातून धूर येऊ लगल्यानं या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानातून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे प्रवास करत होते.

plane file photo
Pratap Sarnaik: "सलमान, शाहरुख, आमिर अन् अमिताभ बच्चन जरी रिक्षा चालवायला लागले तरी त्यांना मराठीत बोलावं लागेल"; प्रताप सरनाईकांचा अंतिम इशारा

या घटनेनंतर तात्काळ एअरपोर्ट प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीज सक्रीय झाल्या त्यानंतर विमान रनवेवरच थांबवण्यात आलं आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तांत्रिक टीमनं लगेचच तपासणी सुरु केली. विमानाच्या इंजिनात नेमका काय दोष निर्माण झाला याची कारणं शोधली जात आहेत. या घटनेनंतर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था आणि सतर्कता वाढवण्यात आली आहे. प्रशासनानं सांगितलं की, आता स्थिती पूर्णतः नियंत्रणात असून सर्व प्रवाशी आणि अधिकारी सुरक्षित आहेत.

plane file photo
Jay Pawar: विधान परिषदेसाठी जय पवारांच्या नावाची चर्चा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वतःच दिली महत्वाची माहिती

यापूर्वीही विमानात बिघाड, दोन डीसीएम करत होते प्रवास

दरम्यान, यापूर्वीही ९ मार्च रोजी इंडिगोच्या विमानात बिघाड झाला होता. त्यावेळी याविमानातून दोन उपमुख्यमंत्री प्रवास करत होते. अमौसी इथल्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला होता. कोलकात्याकडं निघालेल्या या विमानात आधीच निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं ते एक तास उशारीनं सुटणार होतं. या विमानातून त्यावेळी डिसीएम केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक प्रवास करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com