Jay Pawar: विधान परिषदेसाठी जय पवारांच्या नावाची चर्चा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वतःच दिली महत्वाची माहिती

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची चर्चा राज्यभर सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानंतर आकड्यांची गणिते जुळवण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष आणि इच्छुक कामाला लागले आहेत.
Jay Pawar
Jay PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची चर्चा राज्यभर सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानंतर आकड्यांची गणिते जुळवण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष आणि इच्छुक कामाला लागले आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अशातच उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Jay Pawar
Tamil Nadu Political : तमिळनाडूत सरकार स्थापनेत अडचण, स्टॅलिन यांच्या भूमिकेमुळे गेम फिरला! म्हणाले, 'सहा महिने...'

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची जागा ही पारंपारिक रित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होताना पाहायला मिळाला आहे. यंदा देखील जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमत असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे भाजपच्या तुलनेत जास्त मतदार असले तरी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी आकड्यांच्या गणितात मागेच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या जागेवर भाजपने देखील दावा केला असून आपल्याकडे जिल्ह्यात बहुमत असल्याचं सांगितलं आहे.

Jay Pawar
Fuel Price Hike: "मोदींना कळत नसेल तर युपीएचा काळ अभ्यासावा, मनमोहन सिंग यांनी...."; इंधनदरवाढीवरुन काँग्रेसनं दिल्या कानपिचक्या

यामुळे महायुतीत या जागेबाबत एक मत झालं नाही तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मैत्रीपूर्ण लढतील शिंदेंचे 68 मतदार निर्णायक भूमिकेत असणार आहेत. असं असलं तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असा विश्वास स्थानिक नेत्यांना वाटत आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक इच्छुकांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे तब्बल 10 इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये माजी आमदार दिलीप मोहिते, अजित गव्हाणे, माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Jay Pawar
MLC Election: राष्ट्रवादी अन् शिवसेनेकडील 3 जागांवर भाजपचा डोळा! CM फडणवीसांनी माहिती देताच डझनभर नेते लागले कामाला

या नावांची चर्चा सुरू असतानाच काही ठिकाणी जय पवार यांच्या नावाची देखील चर्चा पाहायला मिळाली. जय पवार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमदारकीची निवडणूक लढवतील असे देखील बोलले जात होतं. मात्र, या सगळ्या चर्चांना पूर्णविराम जय पवार यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केला आहे. जय पवार म्हणाले, मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही. पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्वगुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आदरणीय 'दादां'ची विकासाभिमुख विचारसरणी आणि लोकहिताचे कार्य पुढे नेत, प्रलंबित प्रश्नांना ठोसपणे मार्गी लावणारा तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करणारा चेहरा पक्ष निश्चितपणे जनतेसमोर आणेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com