

Pratap Sarnaik : मुंबईत सध्या परप्रांतीय रिक्षा चालक ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्यासाठी मराठीचे धडे दिले जात आहेत. ग्राहकांशी संवाद साधण्यापुरती का होईना मराठी शिकणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात वादही निर्माण झाला असून अनेक रिक्षा चालकांनी राज्य शासनाच्या या नियमाला विरोध केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी आज विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याला अनेक रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली, त्यांना आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चांगलंच झापलं आहे. तसंच कडक इशाराही दिला आहे.
या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेले मराठी साहित्यिक सर्वजण आले होते. त्याचबरोबर रिक्षा संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही मी आमंत्रित केलं होतं. पण यातले बरेच जण या बैठकीला आले नाहीत काहींनी या बैठकीवर बहिष्कार घातला. पण ही गोष्ट चुकीची आहे कारण ही मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये भांडण लावायचा आणि स्वतःच राजकीय करिअर बनवायचं असं जर कोणाचा हेतू असेल तर मी हे यशस्वी होऊ देणार नाही.
सरनाईक यांनी सांगितलं की, या योजनेसाठी जेवढी गरज होती ती सर्व आम्ही पूर्ण केली आहे. विशेषतः मराठी शिकण्यासाठी ती देखील संवाद साधण्यापुरतीच जी तुमच्या प्रवाशांशी संवाद साधण्यापुरीतच आहे. यासाठी आम्ही राज्यातील ४,५०० शिक्षकांना आम्ही नियुक्त केले आहेत. राज्य शासनाचा मराठी विभाग आणि परिवहन विभाग यासाठी सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे, आम्ही १ जून पासून राज्याच्या सर्व शिवसेनेच्या कार्यालयात तसंच भाजपच्या नेत्यांच्या काही कार्यालयांमध्ये तसंच रिक्षा संघटनांच्या कार्यालयांमध्ये आम्ही ऑफलाईन पद्धतीनं आमचे शिक्षक पाठवणार आहोत, त्यांना हे शिक्षक मराठी शिकवणार आहेत. चार तासांचा हा कोर्स असून त्यानंतर त्यांना आम्ही प्रमाणपत्र देखील देणार आहोत. या प्रमाणपत्राची या रिक्षा चालकांना त्यांचं परमिट किंवा लायसन्स रिन्यू करताना गरज पडणार आहे. यासाठी आम्ही मेहनत घेत असून साडेचार हजार शिक्षकांची नियुक्ती, २ कोटींचा निधी अन् जाहीरातही आम्ही यासाठी करत आहोत. १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ४ तासांचा हा कोर्स करायचा आहे. म्हणजे ८५ दिवसांत हा ४ तासांचा कोर्स तुम्ही कधीही करु शकता. ही तरतूद आम्ही करुन ठेवली आहे.
"पण जर १५ ऑगस्टनंतर जर कोणी म्हटलं की, आम्हाला मुदतवाढ द्या तर ती दिली जाणार नाही. १५ ऑगस्टनंतर जर कोणी राजकारण करायला आला तर प्रताप सरनाईक त्याला उभंही करणार नाही. हा कोर्स ऑनलाईन-ऑफलाईनही आहे, त्यासाठी १ लाख पुस्तिका आम्ही वाटल्या आहेत. पण आता इतकं बोलूनही जर कोणी म्हणत असेल की आम्ही मराठी बोलणारच नाही, आम्ही हिंदीतच बोलणार तर हे महाराष्ट्राच चालणार नाही. कायद्यात जे काही दिलं आहे त्याचे सर्व अधिकार परिवहन विभाग आल्याकडं ठेवणार असून त्यानुसार १६ तारखेपासून कारवाई केली जाणार आहे. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान किंवा अमिताभ बच्चन हे जरी उद्या रिक्षा चालवायला लागले तरी त्यांना मराठीत प्रवाशांशी बोलावं लागेल" अशा शब्दांत स्पष्ट इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.