वाझेसोबत गुप्त भेट झाली की नाही? परमबीरसिंहांनीच दिलं उत्तर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह अडचणीत आले आहेत.
Param Bir Singh and Sachin Waze
Param Bir Singh and Sachin Waze Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. सिंह आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची गुप्त भेट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याची चौकशी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे करीत होते. अखेर सिंह यांनीच या भेटीबाबत खुलासा करणारे पत्र नगराळे यांना पाठवले आहे.

सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुख यांच्या वकिलांनी सिंह आणि वाझे यांच्या भेटीची माहिती दिली होती. त्यावर समितीने ही भेट आपल्यासमोर झाली नसल्याचे स्पष्ट करीत आक्षेप घेण्यास नकार दिला. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे.

वाझेसोबत अशी कोणतीही भेट झाल्याचा सिंह यांनी इन्कार केला आहे. त्यांच्या वकिलाने याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांना पत्र पाठवले आहे. चांदीवाल समितीसमोर हजर राहण्यासाठी गेल्यानंतर सिंह यांच्यासोबत वकील होते. त्याचवेळी वाझे हा त्याचे वकील आणि बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसह खोलीत आला. मात्र, सिंह आणि वाझे यांच्यात त्यावेळी कोणताही संवाद झाला नाही. या भेटीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

Param Bir Singh and Sachin Waze
काँग्रेसच्या उमेदवारामुळं विधान परिषदेच्या निकालाचा तिढा; उच्च न्यायालयात वाद

सिंह यांनी या पत्राची प्रत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, चांदीवाल समिती यांना पाठवली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भेटीची चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यास नगराळे यांना सांगितले होते. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. यात कुलाब्यातील पोलीस उपनिरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. वाझेसोबत उपनिरीक्षकासह हे चार कर्मचाऱी होते.

Param Bir Singh and Sachin Waze
अण्णाद्रमुकसह शशिकलांना मोठा धक्का! जयललितांच्या मृत्यूनंतर भाची बनली वारसदार

या भेटीमुळे मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. एकाच प्रकरणातील दोन आरोपींची गुप्त भेट झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित आहे. सध्या वाझे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) ताब्यात असला तरी तो तळोजा कारागृहात आहे. त्याला समितीसमोर हजर करण्याची जबाबदारी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर होती. पोलिसांनी या भेटीची चौकशी सुरू केली असून, यात हे चौघे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com