नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तारीख पे तारीख सुरु आहे. न्यायालयात २२ ऑगस्टला होणारी सुनावणीही पुढे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या आधीही अनेक वेळा ही सुनावणी पुढे गेली आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे २२ ऑगस्टला होणारी सुनावणी २३ ऑगस्टला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सुनावणी नेमकी कधी होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. त्यातच शिंगे गटाच्या १६ आमदारांचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. मागील दोन सुनावणीत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ वकिलांनी घमासान युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा बदलून 22 ऑगस्ट करण्यात आली होती.
तर दुसरीकडे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आता सुनावणी नेमकी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.