Hyderabad Lok Sabha Constituency : हैदराबादमध्ये तिरंगी लढत! भाजपपाठोपाठ आता काँग्रेसकडून ओवैसींच्या विरोधात उमेदवार

Congress Hyderabad Loksabha candidate : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसेने आतापर्यंत एकूण 308 उमेदवारांची घोषणा केली आहे.
Hyderabad Lok Sabha Constituency
Hyderabad Lok Sabha ConstituencySarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसने हैदराबाद मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केली आहे. मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसेने आतापर्यंत एकूण 308 उमेदवारांची घोषणा केली आहे.

बुधवारी सायंकाळी काँग्रेसने(Congress) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत सर्वात विशेष मतदारसंघ म्हणजे हैदराबाद असून, या ठिकाणची लढत ही आता अधिक रंगतदार होणार आहे. कारण या मतदारसंघात आधीच भाजपानेही ओवैसींविरोधात उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे आता येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

याशिवाय काँग्रेसेने खम्मम मतदारसंघातून रामाश्याम रघुराम रेड्डी आणि करीमनगर मतदारसंघातून वलीचला राजेंद्र राव यांना उमेदवारी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hyderabad Lok Sabha Constituency
Rajveer Singh Diler : हाथरसचे भाजपा खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे निधन!

हैदराबाद मतदारसंघामधून AIMIM ने असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्या रूपाने बॅकअप प्लॅन म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज सादर केलेला आहे. हे यासाठी कारण की, काही कारस्ताव असदुद्दीन ओवैसींचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तर AIMIMकडे पर्यायी उमेदवार म्हणून अकबरुद्दीन ओवैसी यांचा अर्ज राहील आणि पक्षाचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहील. हे काही पहिल्यादाच एमआयएमने केलेलं नाही. या आधीही विधानसभा निवडणुकीत असं केलं गेलं होतं.

हैदराबाद 'एमआयएम'चा गड -

हैदराबादला एमआयएमचा गड मानलं जातं. जिथे 1984 पासन ओवैसींचे राज्य आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन पहिल्यांदा या जागेवरून 1984मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. ते 20 वर्षे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्यानंतर या मतदारसंघाचे नेतृत्व असदुद्दीन ओवैसी करत आहेत. ज्यांना यंदा भाजपाच्या उमेदवार माधवी लता(Madhavi Latha) आव्हान देत आहेत. तर आता काँग्रेसनेही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Hyderabad Lok Sabha Constituency
PM Narendra Modi News : मोदींसारख्या नेत्याची अमेरिकेतही गरज! बड्या कंपनीचे अध्यक्ष पंतप्रधानांवर भलतेच खूष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com