Nashik News, 09 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत आहे. काल दिवसभर शिवसेना शिंदे पक्षाकडून गोकुळ गीते यांच्या माघारीच्या बातम्या पसरवल्या. मात्र मध्यरात्रीपर्यंत त्या सर्व फोल ठरल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिवसभर विधानपरिषदेच्या नाशिक मतदारसंघासाठी अनेक राजकीय डाव टाकले. त्यासाठी तीन मंत्री दिवसभर झटत राहिले. मात्र त्यांचे हे मिशन यशस्वी होऊ शकले नाही. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी यापूर्वीच माघारीची तयारी दाखविली होती.
ते या निवडणुकीसाठी गंभीर उमेदवार मानले जात नव्हते. संकटमोचक गिरीश महाजन यांचा शब्द हिरे टाळू शकले नाही. त्यांनी सोमवारी नरेंद्र दराडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कालचा दिवस प्रामुख्याने अपक्ष गोकुळ गीते काय निर्णय घेतात यासाठी महत्त्वाचा होता. त्यासाठी महायुतीचे गिरीश महाजन दादा भुसे आणि उदय सामंत यांनी दिवसभर प्रयत्न केले.
त्याला यश आले नाही. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचे गणेश गीते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गोकुळ गीते माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे दिवसभर गोकुळ गीते यांच्या माघारीच्या चर्चा सुरू होत्या. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या झळकल्या.
मंगळवारी मुंबईत नियोजित कार्यक्रम असल्याने गिरीश महाजन आणि दादा भुसे यांनी ओझर विमानतळावर गोकुळ गीते यांना चर्चेसाठी पाचारण केले. ओझर विमानतळावर सुमारे तासभर गोकुळ गीते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महायुतीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे वारंवार सांगितले.
मात्र गोकुळ गीते यांनी आपल्या राजकीय अडचणी सांगत मंत्री महाजन व अन्य मंत्र्यांकडे असहाय्यता व्यक्त केली. रात्री उशिरा माघारी बाबतच्या अफवा खोडून काढण्यात आल्या. त्यासाठी स्वतः गोकुळ गीते यांनी आपण माघार घेणार नाही. या संदर्भात वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांचं तिन्ही मंत्र्यांकडे हीच भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गीते आणि दराडे यांच्यातील निवडणूक गंभीर वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.