Tushar Kumar UK Mayor : ब्रिटनमध्ये इतिहास घडला; 23 वर्षांचा तुषार कुमार इंग्रजांवर पडला भारी, महापौर पदावर विराजमान

youngest Indian-origin mayor UK : तुषार कुमार यांचे कुटुंब मूळचे हरियाणातील असून अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे.
Tushar Kumar
Tushar KumarSarkarnama
Published on
Updated on

UK Indian-origin politician : ब्रिटनच्या राजकारणात भारतीय वंशाच्या तुषार कुमार या केवळ २३ वर्षांच्या तरूणाने इतिहास घडविला आहे. ब्रिटनमधील एल्स्ट्री-बोरहमवुड शहराच्या महापौरपदी त्यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे ब्रिटनच्या इतिहासात तुषार कुमार हे भारतीय वंशाचे सर्वात तरूण महापौर ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची उपमहापौरपदासाठी निवड करण्यात आली होती.

ब्रिटनमधील मोठ्या लेबर पक्षाचे तरूण नेते म्हणून तुषार कुमार यांना ओळखले जाते. आता त्यांची महापौर पदावर निवड झाल्याने भारतासह तरूणाईसाठीही ही अभिमानाची बाब बनली आहे. तुषार यांनी लंडनमधील किंग्ज महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयातून पदवी मिळविली आहे. आता त्यांनी थेट महापौरपदी झेप घेतली. याबाबत आनंद व्यक्त करताना अधिकाधिक तरुणांना लोकसेवा आणि सामाजिक जीवनात सक्रीय होण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले.

अशी झाली राजकीय सुरूवात

तुषार कुमार यांचे कुटुंब मूळचे हरियाणातील असून अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असतानाच तुषार यांची तेथील राजकारणात एन्ट्री झाली. २०२३ मध्ये केवळ २० व्या वर्षी ते एल्स्ट्री-बोरहमवुड टाऊन कॉन्सिलचे सदस्य म्हणजे नगरसेवक बनले. त्यानंतर मागील वर्षीच ते उपमहापौर बनले होते. त्यावेळी ते भारतीय वंशाचे सर्वात तरूण उपमहापौर होते.

Tushar Kumar
TMC news : धक्कादायक पराभवानंतर ममतादीदींच्या पक्षाला कोर्टाकडून पहिला दिलासा; एक आमदार वाढणार?

मागील आठवड्यात झालेल्या कौन्सिलच्या बैठकीत तुषार यांची महापौरपदी निवड करण्यात आली. आपल्यासाठी हा आनंदाचा क्षण आणि अविश्वसनीय सन्मान असल्याची प्रतिक्रिया तुषार यांनी दिले. यावेळी त्यांनी कुटुंबासह, मित्रपरिवार, सहकारी नगरसेवक आणि सहकार्य करणाऱ्या इतर सर्वांचे आभार मानले.

Tushar Kumar
Congress News : केरळमध्ये शपथविधीच्या काही तास आधी भाजपकडून काँग्रेसला हिमाचल प्रदेशात धक्का; हातातून सत्ता जाणार?

तुषार कुमार हे सामाजिक कामांमध्ये आधीपासूनच सक्रीय होते. आता महापौरपदी निवड झाल्यानंतर लोकांशी अधिक संवाद साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुषार कुमार यांच्याआधी ब्रिटनमध्ये एकाही भारतीय वंशाच्या तरूणाला वयाच्या २३ व्या वर्षी किंवा त्यापेक्षा कमी वयात महापौरपदावर संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे तुषार कुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com