TVK first MP : CM विजय यांच्या पक्षाची संसदेतही होणार दणक्यात एन्ट्री; काही दिवसांतच मिळणार पहिला खासदार

TVK Rajya Sabha entry, CM Vijay latest news : एआयएडीएमके पक्षाचे नेते सी. व्ही. शन्मुगन यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे.
TVK Rajya Sabha entry
TVK Rajya Sabha entrySarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu political news : तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी दणक्यात विजय मिळविला आहे. डीएमके, एआयडीएमके या मातब्बर पक्षांनी धूळ चारत त्यांनी राज्यात सत्ता काबीज केली. त्यानंतर अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली. मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर विजय यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर आता विजय यांच्या पक्षाची संसदेतही एन्ट्री होणार आहे.

विजय यांच्या टीव्हीके पक्षाची विधानसभेची पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत पक्षाने १०८ जागांवर विजय मिळविला आहे. इतर पक्षांना सोबत घेत त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यांच्या सरकारला जेमतेम १२ दिवस झाले आहेत. आता राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

एआयएडीएमके पक्षाचे नेते सी. व्ही शन्मुगन यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यांचा कार्यकाळ २९ जून २०२८ पर्यंत होता. पण आता ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होणार आहे. शन्मुगन हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले आहे. ते पक्षातील बंडखोर नेते असून काही आमदारांना सोबत घेत त्यांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे.

TVK Rajya Sabha entry
CJP Campaign : 'कॉक्रोच जनता पार्टी'कडून पहिल्या मोहिमेची घोषणा, एक केंद्रीय मंत्री निशाण्यावर; काही मिनिटांत अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी

विधानसभेनंतर राज्यात पहिल्यांदाच राज्यसभेची एका जागेसाठी निवडणूक होत आहे. सध्याचे आमदारांचे संख्याबळ पाहता ही एकमेव जागा विजय यांच्या पक्षाला मिळू शकते. सत्तास्थापनेचा घोळ सुरू असताना डीएमके आणि एआयडीएमकेच्या युतीचे प्रयत्न झाले होते. पण यशस्वी ठरले नाही. आता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

TVK Rajya Sabha entry
Congress news : विधानसभा निवडणुकीनंतर आता देशातील 10 राज्यांतील आमदारांचा 'भाव' वाढला; काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवणार

डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्र न आल्यास या निवडणुकीत विजय यांच्या पक्षाचा विजय निश्चित आहे. मात्र, विजय यांना पाठिंबा दिलेल्या अन्य मित्रपक्षांकडूनही राज्यसभेच्या जागेवर मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीत विजय यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर काही दिवसांतच संसदेत पोहचण्याची संधी विजय यांच्याकडे आहे. त्यामुळे ही संधी ते सहजासहजी दवडणार नाही. मात्र, मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यात ते यशस्वी ठरल्यास येत्या १८ जूनला टीव्हीकेचा पहिला खासदार संसदेत दाखल होऊ शकतो. यादिवशी मतदान आणि मतमोजणीही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com