कीव : मागील दीड महिन्यांपासून रशियाकडून युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) सुरू आहे. आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून रशियाने युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) नरसंहार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नागरिकांचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना गोळ्या घालून मारल्याचा दावा युक्रेननं केला आहे. कीवमधील बुचा परिसरात अशा स्थितीतील अनेक मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे जग हादरून गेलं आहे.
रशियाचं (Russia) सैन्य कीवमधून माघारी फिरलं आहे. त्यानंतर या शहरातील दृष्ट विदारक दिसत आहे. युक्रेन (Ukraine) प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार, रविवारपासून रशियाचं सैन्य माघाली परत असले तरी त्यांनी केलेल्या गुन्हयांमुळे शहरातील दृष्य एखाद्या भीतीदायक चित्रपटाप्रमाणे दिसत आहे. बुचा परिसरात जवळपास ४१० मृतदेह आढळून आले आहेत.
शहरातील एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रशियाचे सैन्य प्रत्येक इमारतीत घुसून नागरिकांना बाहेर काढत होते. रशियाविरोधी कारवायांची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या फोनची तपासणी करत होते. त्यानंतर काहींना सोडून दिलं. तर काहींची हत्या केली जात होती.’ आपला शेजारी लाकडं आणण्यासाठी बाहेर गेला असताना रशियाच्या सैन्याने आधी त्याच्या पायावर गोळी झाडली. तो खाली पडल्यानंतर त्याच्यावर बेछूट गोळीबार करून ठार मारले, असंही एका रहिवाशाने सांगितलं.
काही नागरिकांचे हात-पाय बांधून त्यांना मारल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोविच यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. तसेच या महिलांचे मृतदेह नंतर जाळण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे. रशियाकडून मात्र नरसंहाराचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. हे फोटो आणि व्हिडीओ पाश्चिमात्य देशांतील माध्मयमांनी गोळा केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
बुचामधील एकाही नागरिकावर असे अत्याचार करण्यात आलेले नाही, असं रशियन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने युक्रेनच्या दावा गांभीर्याने घेत त्याची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत रशियाकडे विचारणा करण्यात आली आहे. ब्रिटन, फ्रान्ससह अन्य काही देशांनी रशियाच्या या कृत्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.