Central Minister Anurag Thakur Ladakh Visit : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी 14 हजार फूट उंचीवर चालवला हँडपंप आणि पाणीही प्यायले

Political News : अनुराग ठाकूर हे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर होते.
Anurag Thakur
Anurag Thakur Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shrinagar : भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर होते.या दौऱ्यावेळी त्यांनी लष्कराचे सैनिक, इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि भारत-चीन सीमेवरील चमोर भागात राहणाऱ्या लोकांची भेट घेतली. अनुराग ठाकूर यांनी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेतली. याचवेळी ठाकूर यांनी बुधवारी (दि.११) लडाखमधील मनाली-लेह महामार्गावर 14 हजार फूट उंचीवर असलेल्या डेब्रिंग गावात हातपंप चालवून पाणी प्यायलं.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजप खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांची भेट घेतली. तसेच लडाखमधील मनाली-लेह महामार्गावर 14 हजार फूट उंचीवर असलेल्या डेब्रिंग गावात हातपंप चालवून पाणी प्यायलं. या व्हिडीओसोबत त्यांनी गावात हातपंप चालवून गोड पाणी प्यायल्याने एक वेगळाच अनुभव मिळतो असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Anurag Thakur
PCMC Politics : फडणवीसांना सोडून अजितदादांसोबत गेलेले तुषार कामठे गडबडले अन् राष्ट्रवादीच्या शिलवंतही गोंधळल्या

ठाकूर हे दोन दिवसांच्या लडाख(Ladakh) दौऱ्यावर होते. याठिकाणी त्यांनी लष्कराचे सैनिक, इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स (ITBP)आणि भारत-चीन सीमेवरील चमोर भागात राहणाऱ्या लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 15000 फूट उंचीवर भारत-चीन सीमेवर लक्ष ठेवणाऱ्या ITBP जवानांशी संवाद साधला. या उंचीवर नैसर्गिक आव्हानांचा सामना करून आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिकांविषयी कौतुकोद्गार काढले.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे...?

अनुराग ठाकूर हे ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत हातपंप चालवताना दिसत आहे. ते हातपंप चालवत असताना एक व्यक्ती पाणी प्यायलं, त्यानंतर ठाकूर हे देखील पाणी प्यायले. त्यांनी ट्विटरवरील व्हिडिओला गावात हातपंप चालवून गोड पाणी प्यायल्यानं एक वेगळाच अनुभव मिळतो असं म्हटलं आहे.

Anurag Thakur
Bihar Politics: बिहारमध्ये राजकारण तापलं; भाजपाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज; एकाचा मृत्यू

ठाकूर यांनी या दौऱ्यात 15 हजार फूट उंचीवर कार्यरत असलेल्या जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतक्या उंचीवर नैसर्गिक संकटांना सामना करत सीमारेषेवर आपलं कर्तव्य निभावणाऱ्या जवानांविषयी गौरवौद्गार काढले. त्यांनी देशाच्या भल्यासाठी प्रत्येक नागरिकाने काम केले पाहिजे असंही म्हटलं. यावेळी सीमारेषेवर तैनात असणं ही मोठी गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.