Rajasthan Assembly Election : केंद्रीय मंत्री राजस्थानच्या रिंगणात? भाजप पूर्ण ताकद पणाला लावून उतरणार...

Rajasthan Assembly Election : भाजपकडून राजस्थानातील उमेदवाराची यादी फायनल करून...
Rajasthan Assembly Election
Rajasthan Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : नोव्हेंबर महिन्यात राजस्थानसह पाच राज्यांतील निवडणुका होत आहेत. इथे थेट लढाई भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर सत्ता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. मात्र, भाजपने इथे शक्ती पणाला लावली आहे. मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपकडून काही केंद्रीय नेत्यांना विधानसभेच्या मैदानात उतरविले जाणार आहे.

Rajasthan Assembly Election
BJP MP News : भाजप खासदारांचा पत्ता कट होणार? सुमार कामगिरी असलेल्यांना नारळ...

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात कुठल्याही परिस्थितीत राजस्थानची निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार काही नवीन चेहरे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी भाजपने चालवली आहे. काही केंद्रीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले जाणार आहे. त्यानुसार काही जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची समजते.

केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह राज्यवर्धनसिंह राठोड आणि दिया कुमारी यांना निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने राजस्थान जिंकण्यासाठी सर्व शक्य पर्यायांची चाचपणी केली आहे. भाजपकडून राजस्थानातील उमेदवाराची यादी फायनल करून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे.

Rajasthan Assembly Election
Assembly Election Survey : मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये कुणाचं सरकार येणार; काय सांगतो ताजा सर्व्हे ?

यानुसार आता राजस्थानातील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. राजस्थानमधील भाजपचे स्क्रीनिंग कमिटीने उमेदवाराचे नाव अंतिम केले असून, आता ही यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल इलेक्शन कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com