Amit Shah : राजीनाम्याच्या मागणीवर शहांचं मोठं विधान; म्हणाले, मी राजीनामा दिला तरी..!

Lok Sabha Rajya Sabha Dr Babasaheb Ambedkar Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या टीकेला अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
Amit Shah, Mallikarjun Kharge
Amit Shah, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे शाह यांनी म्हटले आहे. खर्गे यांच्या या मागणीचा शहांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांना प्रत्युत्तर देताना शाह यांनी टोलाही लगावला.

अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणावरून काँग्रेसने शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शाह यांनी राज्यसभेत आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शहांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस संविधानविरोधी, आंबेडकरविरोधी, लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली.

Amit Shah, Mallikarjun Kharge
Amit Shah : विरोधकांनी अमित शहांना घेरण्यासाठी सर्व आयुधे काढली बाहेर; 12 पर्यंत अल्टिमेटम अन् संसदेत मोठा प्रस्ताव...

खर्गेंनी मागितलेल्या राजीनाम्यावर बोलताना आधी शहांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, खर्गे राजीनामा मागत आहे. यामुळे त्यांना आनंद होत असेल आणि कदाचित मी राजीनामा दिला तरी तरी त्यांच्या समस्येचा अंत होणार नाही. अजून त्यांना कमीत कमी पुढील 15 वर्षे त्याचठिकाणी बसावे लागेल, जिथे ते सध्या बसतात. खर्गेजी माझ्या राजीनाम्यामुळे तुमची डाळ शिजणार नाही.

शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

संविधानाला स्वीकारलेल्या घटनेला 75 व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर सदस्यांची, पक्षांची भूमिका वेगळी असते. पण संसदेत चर्चा होत असताना कोणतेही भाष्य तथ्यावर आधारीत असावी. कालपासून काँग्रेसने तथ्यांची मोडतोड करून मांडल्याने ते निंदनीय आहे, असे शाह म्हणाले.

Amit Shah, Mallikarjun Kharge
Amit Shah : विरोधकांनी अमित शहांना घेरण्यासाठी सर्व आयुधे काढली बाहेर; 12 पर्यंत अल्टिमेटम अन् संसदेत मोठा प्रस्ताव...

भाजपच्या सदस्यांनी संविधान आणि त्याच्या मुल्यांवर आणि जेव्हाजेव्हा भाजपच्या सत्तेच्या काळात भाजपने त्याचे कसे संरक्षण केले, यावर तथ्यांसह मांडणी केली. यामध्ये काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी पक्ष असल्याचे सिध्द झाले. काँग्रेसने सावकरांचाही अपमान केला. आणीबाणी आणून संविधानाचा अपमान केला. न्यायव्यवस्था, महिला, सैन्याचा अपमान केल्याचा निशाणा शाह यांनी साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com