

Houthi Entry Impact : मागील महिनाभरापासून इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणला झुकविण्यासाठी बॉम्ब वर्षाव केला जात आहे. पण इराण मागे हटण्यास तयार नाही. चर्चेलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी केली आहे. मात्र, आता इराणही एकटा नाही. त्यांच्या मदतीला हुथी बंडखोर धावून आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी इराणवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले होते. पण काही तासांतच त्यांचा ही घोषणा फोल ठरली आता त्यांचा इराणवरील हल्ल्याचा प्लॅन समोर आला आहे. आता बॉम्ब वर्षावासोबतच थेट इराणमध्ये सैन्य घुसविण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून ती ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने तयारी केली आहे.
अमेरिकेने यापूर्वीच हजारो सैनिक आखाती देशांमध्ये तैनात केले आहेत. समुद्रातही युध्दनौका सज्ज आहेत. गरज पडल्यास त्याचाही वापर केला जाणार आहे. प्रामुख्याने इराणची सैन्य ताकत कमकुवत करण्याची अमेरिकेची रणनीती आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी अडथळे ठरत असलेल्या इराणच्या मोक्याच्या ठिकाणी हल्ला करून ती ताब्यात घेण्यासाठी मोहीत हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून खार्गे बेटांना टार्गेट केले जाण्याची दाट शक्यता आहे. इराणचे हे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. या बेटावर कब्जा मिळाल्यास अमेरिकेकडून इराणची आर्थिक कोंडी केली जाऊ शकते. असे झाल्यास इराण नमते घ्यावे लागू शकते. त्याचप्रमाणे होर्मूझ सामुद्रधुनी, आण्विक ठिकाणे, समुद्रातील इराण तेल वाहतूक करणारी जहाजे आदींवर कब्जा मिळविण्यासाठीही अमेरिकेने रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अमेरिकेने मोठी मोहीम हाती घेतली असली तरी आता इराण या युध्दात एकटा नाही. येमेनमधील हुथी बंडखोरांनाही शनिवारी या युध्दात उडी घेत इस्त्रायलवर हल्ला केला. हुथी हा येमेनमधील बंडखोर गट असून त्यांचे स्वतंत्र सैन्य आहे. उत्तर येमेनमधील बहुतेक ठिकाणांवर त्यांचा कब्जा आहे. लाल समुद्रामध्ये त्यांनी मागील काळात अनेक माल वाहतूक जहाजांवर हल्ले करत लक्ष वेधून घेतले होते.
इराण युध्दामध्येही हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य केल्यास जगाची चिंता आणखी वाढू शकते. होर्मुज सामुद्रधुनीप्रमाणेच बाब – एल् – मांदेब ही सामुद्रधुनी इंधन वाहतुकीसाठी महत्वाची मानली जाते. सागरी वाहतुकीचे सर्वांत महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेली ही सामुद्रधुनी सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर महत्त्वाची बनली आहे. भूमध्य समुद्र, हिंदी महासागर आणि आशियातील देशांशी व्यापारी जलमार्गाने जोडणारी ही सामुद्रधुनी आहे. प्रामुख्याने यूरोप व आशिया खंडांतील मालवाहतूक याच सामुद्रधुनीतून करावी लागते. त्यामुळे हुथींनी जहाजांना लक्ष्य केल्यास जगाची चिंता आणखी वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.