US Election 2024 : खटाखट...खटाखट...खटाखट..! कमला हॅरिस यांची कमाल, पक्षावर पैशांचा पाऊस...  

Donald Trump Kamala Harris : कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असून डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देणार आहेत.
Kamala Harris
Kamala HarrisSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांनी चुरस निर्माण केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देणाऱ्या कमला हॅरिस त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षासाठीही लकी ठरल्या आहेत. जो बायडेन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर त्यांचे नाव समोर आले अन् पक्षावर जणू पैशांचा पाऊस पडू लागला आहे.

डेमोक्रेटिक पक्षाच्या बॅंक खात्यात खटाखट...खटाखट पैसे जमा होत आहेत. कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेला मोठे समर्थन मिळत असून केवळ आठवडाभरातच तब्बल 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 हजार 640 कोटी रुपये निधी मिळाला आहे.

Kamala Harris
Arif Aqeel Passes Away: सहा वेळा आमदार असलेले, काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ अकील यांचे निधन

'न्यूज 18' ने दिलेल्या वृत्तानुसार, कमला हॅरिस यांची प्रचार मोहिम सुरू होऊन अजून आठवडाही झालेला नाही. त्याआधीच एवढा मोठा निधी जमा झाल्याने त्यांना मिळणाऱ्या समर्थनाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या कॅम्पेन टीमने रविवारी सांगितले की, 66 टक्केहून अधिक मदत ही 2024 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच निधी देणाऱ्यांकडून आलेली आहे. एवढेच नाही तर 1 लाख 70 हजार हून अधिक समन्वयक कमला हॅरिस यांच्यासाठी मदत गोळा करण्यासाठी सक्रीय आहेत.

कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेचे कम्युनिकेशन संचालक मायकल टायलर म्हणाले, ‘उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक खूप चुरशीची होणार असून काही राज्यांतील मतदानावरच निकाल लागेल.’ दरम्यान, ट्रम्प यांना मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.

Kamala Harris
Shreyasi Singh News : बिहार भाजपच्या नेमबाज आमदार श्रेयसी सिंह; राजकारणानंतर आता ऑलिम्पिकही गाजवणार!

जूनच्या अखेरीस ट्रम्प यांच्या मोहिमेसाठी सुमारे 21 अब्ज रुपयांचा निधी जमा झाला होता. त्यावेळी डेमोक्रेटिक पक्षाचा निधी 18 अब्ज एवढा होता. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीनंतर त्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असल्याने त्यांच्या समर्थकांकडून निधी मिळवण्यासाठीही जोरदार प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com