India violence alert : प्रक्षोभक भाषणांवर अन् कट्टरपंथींवर केंद्राचा करडी नजर! हिंसाचाराच्या शक्यतेने राज्यांना हायअलर्ट

BJP-led Modi government has issued an alert to state governments over possible law and order disturbances in India : अमेरिका आणि इस्रायलने इराण केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभू्मीवर भारतात संभाव्य हिंसाचाराच्या शक्यतेने केंद्रातील मोदी सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
India violence alert
India violence alertSarkarnama
Published on
Updated on

Modi government alert : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ले तीव्र केले आहे. पश्चिम आशियातील युद्धाग्नी भडकला असून त्याचे जगभर पडसाद उमटत आहे. या युद्धाच्या सुरवातीलाच इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यूनंतर त्याचे जगभर पडसाद उमटले.

भारतात श्रीनगर, उत्तर प्रदेश, मुंबईत (Mumbai) शिया मुस्लिम समुदायाने तीव्र आक्रोश व्यक्त केला. शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यानंतर केंद्रातील मोदी सरकार अलर्ट झालं असून, भारतात संभाव्य हिंसाचाराच्या शक्यतेचा विचार करत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

केंद्रातील Ministry of Home Affairs यांनी देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवून प्रक्षोभक आणि चिथावणीखोर प्रवचन देणाऱ्या कट्टरपंथी उपदेशकांची ओळख पटवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या, तसेच आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोपनीय माहितीची वेळेवर देवाणघेवाण, संवेदनशील भागांमध्ये विशेष नजर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज या पत्रात अधोरेखित केली आहे.

India violence alert
Muslim protests : इराणचे खामेनेई यांचा मृत्यू; संग्राम जगतापांची 'अजब-गजब' प्रतिक्रिया चर्चेत!

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने नागरी विमान वाहतुकीत सर्वोच्च सुरक्षिततेचे उपाय तातडीने लागू केले आहेत. Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी भारतीय विमान कंपन्यांना 2 मार्चपर्यंत Iran, Iraq, Israel आणि आखाती प्रदेशातील काही उच्च-जोखीम हवाई क्षेत्र टाळण्याचे निर्देश दिलेत.

India violence alert
Sangram Jagtap controversial statement : दिवाळीला खरेदी हिंदूंकडून, आता रिक्षावालाही हिंदूच? जगतापांच्या विधानाने पुन्हा पेटला वाद

750 हून अधिक उड्डाणं रद्द

युद्धस्थितीचा आढावा घेऊन सुमारे 750 हून अधिक उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहेत. 'Air India'ने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारकडे ये-जा करणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच अमृतसर–बर्मिंगहॅम, दिल्ली–झुरिच, दिल्ली–कोपनहेगन आणि बर्मिंगहॅम–दिल्ली ही काही युरोपमधील उड्डाणंही रद्द केली. Akasa Air ने अबू धाबी, दोहा, जेद्दाह, कुवेत आणि रियाधसाठी उद्याची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. IndiGo नेही पश्चिम आशियातील काही हवाई मार्गांवरील निवडक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे तात्पुरते निलंबन वाढवले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपकडे जाणारी इतर उड्डाणं पर्यायी मार्गाने वेळापत्रकानुसार सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तानात हिंसाचार

नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. कराचीपासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंतच्या हिंसाचारात आतापर्यंत 35 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. निदर्शनांदरम्यान झालेल्या गोळीबारात हे मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com