Lucknow Fire: उत्तर प्रदेशमध्ये भीषण आग! कोचिंग क्लासमधील 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

15 Killed In Fire At Lucknow Coaching Centre:लखनौमधील अलीगंज परिसरातील निवासी इमारतीत सुरू असलेल्या कोचिंग क्लासला भीषण आग लागून 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत चौकशी सुरू.
Lucknow Fire  News
Lucknow Fire NewsSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh fire incident: उत्तर प्रदेशमध्ये लागलेल्या आगीत कोचिंग क्लासमधील 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लखनौ येथील अलींगज परिसरात पुरानिया येथील तीन मजली इमारतीत लागलेल्या या आगीत १५ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याच्या प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आणि वाचनालय सुरू होते. तळमजल्यावर पाळीव प्राण्यांचे दुकान, तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी अचानक इमारतीत आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली गेलीस आग पसरल्याने आत अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Lucknow Fire  News
NEET UG Re-Exam 2026 Scam: NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह! 9 डमी विद्यार्थ्यांसह 30 जणांना अटक

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग अतिशय वेगाने पसरल्याने अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी आणि छताचा आधार घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नांनंतर अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, दाट धुरामुळे काही विद्यार्थ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Lucknow Fire  News
पेन्शन सेवा आता मोबाईलवर! Maha-UPLABDHI’ म्हणजे काय?

जखमींना तातडीने केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने बचावकार्य पूर्ण झाल्याचे सांगितले असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित इमारत मूळतः निवासी वापरासाठी मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्याच इमारतीत नियमांना बगल देत कोचिंग सेंटर सुरू करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Lucknow Fire  News
MLC Election Results : विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा धुव्वा; 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय, एक जागा कोणाला?

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा नकाशा निवासी इमारत म्हणून मंजूर झाला होता. तरीही त्या ठिकाणी कोचिंग क्लास सुरू ठेवण्यात आला. यामुळे अग्निसुरक्षा आणि इतर आवश्यक परवानग्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, त्याची किंमत निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमावून चुकवावी लागल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com