

Andhra Pradesh alliance controversy : तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी सुपरस्टार विजय विराजमान झाल्यानंतर शेजारीत आंध्र प्रदेशमध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व जन सेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण आणि विजय यांची तुलना होऊ लागली आहे. विजय यांनी अत्यंत कमी कालावधीत स्वबळावर निवडणूक लढवत सत्ता काबीज केली. पवन कल्याण यांनाही ते शक्य झाले असते. मात्र त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी युती केली, असा सूर आता जन सेना पक्षात सुरू झाला आहे.
पवन कल्याण यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या भावना समजून घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील राजकीय स्थिती वेगळी आहे. त्याकडे एकाच चष्म्यातून पाहता येऊ शकत नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले आहे. तसेच भाजप आणि टीडीपीशी युतीचे त्यांनी समर्थनही केले आहे. त्यामागे एक घटना टर्निंग पॉईंट ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगलागिरी येथील पक्षाच्या मुख्यालयात बोलताना पवन कल्याण म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत जन सेना पक्षाने टीडीपी आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न मला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने विचारला जात आहे. प्रामुख्याने विजय यांना सत्ता मिळाल्यानंतर आपल्या पक्षानेही स्वतंत्र निवडणूक का लढली नाही, असे विचारले जात आहे.
आंध्र प्रदेशपेक्षा तमिळनाडूतील वातावरण वेगळे आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी मी पक्ष सुरू केला. मी एनटीआर यांचे राजकारण अत्यंत जवळून पाहले. मी नक्षलवाद्यांचा काळही मी पाहिला. त्याचा माझ्या विचारांवर खोलवर परिणाम झाला. कोणतेही पद आणि सत्तेपेक्षा माझ्यासाठी विचारधारा महत्वाची आहे. त्याच हेतूने मी पक्ष पुढे घेऊन जात असल्याचे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले.
आंध्र प्रदेशातील राजकीय स्थिरतेचा विचार लक्षात घेऊन भाजप आणि टीडीपीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पवन कल्याण यांनी सांगितले. एकट्याने लढण्याची ताकद आपल्यामध्ये होते. मचिलिपट्नम येथील एका सभेसाठी सुमारे दहा लाख लोक उपस्थित होते. पण आंध्र प्रदेश कठीण काळातून जात होते. आमच्यामध्ये काही मुद्यांवरून मतभेद असतील पण चंद्राबाबू नायडू यांना अटक झाली, त्यावेळी तो आंध्र प्रदेशासाठी आव्हानात्मक काळ होता. राज्याच्या भवितव्यासाठी आघाडी करणे गरजेचे होते. राजकीय द्वेषापेक्षा राज्याची स्थिरता महत्वाची होती, असे सांगताना पवन कल्याण यांनी त्यासाठी नायडू यांची अटक टर्निंग पॉईंट ठरल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.