Suvendu Adhikari PA Death : ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला पुढं जाऊ दिलं अन् तिथेच घात झाला; हल्लेखोरांनी सुवेंदू अधिकारींच्या पीएला नेमकं कसं संपवलं?

Suvendu Adhikari PA Chandranath Rath murder : मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील डोहरिया परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ, आपल्या गाडीतून प्रवास करत होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता, तर चंद्रनाथ त्याच्या शेजारच्या सीटवर बसले होते.
Chandranath Rath was shot dead in West Bengal violence
Police investigate the crime scene after BJP leader Suvendu Adhikari’s PA Chandranath Rath was shot dead in West Bengal violence. The attack has intensified political tensions in the state.Sarkarnama
Published on
Updated on

Suvendu Adhikari PA Murder : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालानंतर रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच तिघांची हत्या झाली आहे. अशातच बुधवारी रात्री पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रि‍पदाचे संभाव्य उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

या घटनेमुळे बंगालसह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील डोहरिया परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ, आपल्या गाडीतून प्रवास करत होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता, तर चंद्रनाथ त्याच्या शेजारच्या सीटवर बसले होते.

याचवेळी एक गाडी खूप वेळ त्यांच्या 'स्कॉर्पिओ'चा पाठलाग करत होती. अशातच मागून पाठलाग करणारी गाडी अचानक पुढे आली ज्यामुळे चंद्रनाथ यांच्या गाडीचं स्पीड कमी झालं. याचवेळी त्यांच्या शेजारून दुचाकीवरून आलेले हल्लेखोर त्यांच्या गाडीजवळ आले आणि थेट चंद्रनाथ यांच्या छातीवर अंदाधुंद गोळीबार केला.

Chandranath Rath was shot dead in West Bengal violence
West Bengal Election : अमित शाह बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच चक्रे फिरली; भाजपच्या महिला आमदाराला 'दिल्लीतून बोलवलं!

यावेळी हल्लेखोरांनी एकूण दहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. ज्यापैकी काही गोळ्या त्यांच्या छातीत शिरल्या. या घटनेनंतर तात्काळ त्यांना जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या हत्येमुळे बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून बंगालमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.

नेमका हल्ला कसा झाला?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ यांची हत्या पूर्वनियोजित होती. कारण, एक चारचाकी आणि एक दुचाकी अशी दोन वाहने खूप वेळ चंद्रनाथ यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. अचानक यातील चारचाकी कारने चंद्रनाथ यांच्या वाहनाला ओव्हरटेक केल्याने चंद्रनाथ यांच्या गाडीचा वेग कमी होताच दुचाकीवरून आलेल्या लोकांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.

Chandranath Rath was shot dead in West Bengal violence
BJP Suvendu Adhikari aide shot dead : राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PAवर अंदाधुंद गोळीबार, जागीच मृत्यू

यावेळी हल्ल्यात तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत, पोटात आणि डोक्यात लागल्या. तर भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी सांगितले की, "चंद्रनाथ यांच्या छातीतून 5 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत." दरम्यान, सोशल मीडियावर घटना स्थळावरील काही व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये गाडीच्या खिडकीवर झाडलेल्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय या हल्ल्यात चंद्रनाथ यांचा ड्रायव्हर देखील जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com