Parliament Session 2023 : नव्या संसदेत पहिल्याच दिवशी का भडकले अमित शाह ?

Amit Shah Angry : जुन्या संसदेला निरोप दिल्यानंतर आजपासून नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले.
Parliament Session 2023 :
Parliament Session 2023 : Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जुन्या संसदेला निरोप दिल्यानंतर आजपासून नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांची भाषणे झाली. पण अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शाह चांगलेच संतापल्याचे पाहालया मिळाले.

अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या वक्तव्यात जे म्हटले आहे ते चुकीचे आहे. जर ते खरे असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत किंवा त्यांनी विधान मागे घ्या. ते म्हणाले की, महिला आरक्षणाचे जुने विधेयक रद्द झाले आहे. अधीर रंजन चौधरी हे महिला आरक्षण विधेयकाबाबत लोकसभेत विधान करत होते. त्यावेळी अमित शाह यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता.

Parliament Session 2023 :
Sharad Pawar Pune : पुणे जिल्ह्यात अजितदादांना घेरण्याची शरद पवारांची 'चाल'; दिलीप मोहितेंना पहिला धक्का !

केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत महिला आरक्षणाबाबतचे विधेयक संसदेत मांडले. त्यापूर्वी, सरकारने लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला 'नारी शक्ती वंदन कायदा' असे नाव दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली; पण काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र पंतप्रधानांंचा दावा खोडून काढला.

अधीर रंजन म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असतानाच काँग्रेसने हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले होते. कधी-कधी महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर होते, पण लोकसभेत नाही आणि ते लोकसभेत मंजूर झाले तर ते राज्यसभेत मान्य होत नाही, असा दावा केला. पण त्यांच्या या दाव्याने मात्र अमित शाह चांगलेच भडकले.

अधीर रंजन जे बोलले ते वस्तुस्थितीनुसार चुकीचे आहे. जुने बिल लॅप्स झाल्याची आमच्याकडे स्पष्ट माहिती आहे. याशिवाय राजीव गांधींच्या काळात महिला आरक्षणाबाबत कोणतेही विधेयक लोकसभेत मंजूर झाले नाही, असा दावाही अमित शाहांनी केला.

लोकसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नाही आणि लोकसभेचा कार्यकाळ संपला तर ते विधेयक आपोआप संपुष्टात येते. या गोष्टीचा खुलासा व्हायला हवा आणि अधीर रंजन यांच्याकडे वेगळी माहिती असल्यास ती सभागृहाच्या पटलावर ठेवली पाहिजे, असंही अमित शाहांनी नमूद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Parliament Session 2023 :
Dhangar Reservation : आरक्षण मिळणार असेल तर...; धनगर आरक्षणाबाबत बोलताना शाहू महाराज स्पष्टच बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com