

Yogi Adityanath News : भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण? असा प्रश्न सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. त्यामध्ये गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा यासाठी होत असते.
दरम्यान, 'द स्टेट्समॅन' या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधानपदाविषयी योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
ते म्हणाले, मी जबाबदारीच्या भावनेने आणि 'राष्ट्र प्रथम' हे मार्गदर्शक तत्त्व बाळगून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने माझ्यावर उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
मी याला माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे सौभाग्य आणि सर्वात मोठी जबाबदारी मानतो. उत्तर प्रदेशला आर्थिक, सामाजिक आणि शासनप्रणालीच्या बाबतीत पुढे नेण्यावर माझे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे, असे ते म्हणाले.
योगी यांनी अप्रत्यक्षपणे ते पंतप्रधानाच्या शर्यतीत नाही. उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले.
२०२७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मित्रपक्षांसोबत जागा वाटपाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, मित्रपक्षांसोबत जागावाटप हा एक संघटनात्मक मुद्दा आहे. सरकारी योजनांचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचतील याची खात्री करणे ही माझी जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे आणि ते राज्याच्या विकासात योगदान देऊ शकले पाहिजेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.