Aaditya Thackeray : पोलिसांना एक दिवस मोकळे हात द्या, गुन्हेगारी संपवतील'; पुणे, मुंबईतील गोळीबारावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा!

Devendra Fadnavis News : राज्यातील कायदा-सुव्यवस्था, दुष्काळ आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
Aditya-Thackeray-devendra-Fadnavis
Aditya-Thackeray-devendra-FadnavisAditya-Thackeray-devendra-Fadnavis
Published on: 
Updated on: 

Mumbai News : पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे; मात्र पोलिसांना मोकळे हात दिले जात नाहीत. गृहखात्याचा वापर विरोधकांच्या मागे लागण्यासाठी केला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पोलिसांना एक दिवस जरी मोकळे हात दिले, तर ते गुन्हेगारी कायमची संपवू शकतात, असेही ते म्हणाले.

वरळीतील विविध प्रश्नांसंदर्भात एसआरए, म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, दुष्काळ आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

नाकाबंदी असतानाही गोळीबार कसा झाला?

पुण्यात आणि मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी नाकाबंदी असतानाही रात्री गोळीबाराची घटना घडली. टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांनाही बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहावे लागत आहे. पूर्वी पोलिसांचा सर्वत्र धाक होता; मात्र आता गुन्हेगारांना ती भीती राहिलेली नाही. गुन्हेगारांविरोधात योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबई महापालिकेला ई-मेलद्वारे आलेल्या धमकीवरूनही त्यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. लोकांनी घाबरून राहावे, असे सरकारला वाटते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Aditya-Thackeray-devendra-Fadnavis
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

'याला फोडा, त्याला फोडा आणि वृक्ष तोडा'

गृहमंत्री पोलिसांना मोकळे हात देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री म्हणजे 'याला फोडा, त्याला फोडा आणि वृक्ष तोडा', अशी परिस्थिती झाली असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. रात्री झाडाला हात लावू नये, असे आपल्याकडे म्हणतात. मात्र, फडणवीस (Devendra Fadnavis) रात्रीच्या अंधारात झाडे कापतात आणि पक्ष फोडतात, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना जिथे हिरवळ शिल्लक आहे, तिथेही सरकारकडून वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Aditya-Thackeray-devendra-Fadnavis
BJP Politics : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे संकेत; रत्नागिरीत समीकरणे बदलण्याची शक्यता; भाजपमध्ये मोर्चेबांधणी वेग

गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, ते पाणी गेलं कुठे?

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एल निनोमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. शेती आणि उद्योगांना पाणीपुरवठा कसा करायचा, याचा विचार सरकारने केलेला नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी साचलेले पाणी नेमके गेले कुठे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या पाणी व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Aditya-Thackeray-devendra-Fadnavis
NCP Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा, पक्षाने जाहीर केली भूमिका; स्पष्टच सांगितले, 'त्या' ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स...

'पीएम केअर्स फंडातून पैसे आणा'

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पाच हजार रुपयांची मदतही अद्याप अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. राज्य सरकारकडे पैसे नसतील, तर पीएम केअर्स फंडातून पैसे आणून शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी फडणवीस सरकारला जाब विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.