Rat Bites ICU Patient : धक्कादायक! आयसीयुतील रुग्णाचा हात उंदराने कुरतडला, सरकारी रुग्णालयातील धक्कादायक घटना

Bhayander Government Hospital: रुग्णाच्या मुलाने उंदराने कुरतडल्याची बाब कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या निदर्शनास आणूं दिली मात्र परिचारिकेने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
Rat bite incident reported in ICU ward of Bhayander government hospital, raising questions over hospital hygiene and management.
Rat bite incident reported in ICU ward of Bhayander government hospital, raising questions over hospital hygiene and management.sarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Bhayander News : भाईंदर पश्चिम येथील भीमसेन जोशी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर असलेल्या ८९ वर्षीय महिलेचा हात चक्क उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ही बाब लक्षात आली. त्यांनंतर कक्षातील डॉक्टर व परिचारिका यांना कार्यामुक्त करून ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सुहासिनी माठेकर (८९) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच हृदयविकार असल्याने गंभीर स्थितीत १२ मार्चला भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती पाहून त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

सोमवारी (ता.१६) पहाटे ५.३० च्या सुमारास माठेकर यांच्या अंगावर असलेल्या चादरी खालून एक उंदीर आत शिरला व त्याने त्यांचा हात कुरतडला. यामुके हाताला मोठी जखम होऊन चादर रक्ताने भिजली. ही बाब माठेकर यांच्या मुलाला दिसली त्यांनी ही बाब कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या निदर्शनास आणूं दिली मात्र परिचारिकेने ते बेड सोर्स आहेत असे सांगितले.

Rat bite incident reported in ICU ward of Bhayander government hospital, raising questions over hospital hygiene and management.
Adinath Shastri Maharaj Health Update : ‘मी ठीक आहे’, आदिनाथ शास्त्री महाराज; बोलतात पण कारण गुप्त, अनुयायांना दिला संदेश

मात्र चादरीवर उंदराची पावले स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगताच कर्मचाऱ्यांची एकाच धावपळ उडाली व त्यांनी डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले. अतिदक्षता विभागात याआधी देखील दोन वेळा उंदीर फिरताना फिरत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आईचे काही बरे वाईट झोके तर त्याला सर्वस्वी रुग्णालय जबाबदार असेल असा आरोप माठेकर यांच्या कन्या मिलन माठेकर देसाई यांनी केला आहे.

Rat bite incident reported in ICU ward of Bhayander government hospital, raising questions over hospital hygiene and management.
Ambadas Danve News: कापून टाकू, फाडून टाकू म्हणत अंबादास दानवेंना धमकी देणारा निघाला भाजप कार्यकर्ता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com