Aditi Tatkare : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच बॅनरवरून अजितदादा, सुनेत्रा पवारांचे फोटो गायब; तटकरे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, 'निष्ठा ठरवू नये...'

Aditi Tatkare reaction to Ajit Pawar photo missing banner : कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर फक्त तटकरे कुटंबातील व्यक्तींचे फोटो दिसत होते. या बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीका करण्यात येत होती.
Aditi Tatkare reacts to controversy over missing photos of Ajit Pawar and Sunetra Pawar on a political banner
Aditi Tatkare reacts to controversy over missing photos of Ajit Pawar and Sunetra Pawar on a political bannerSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar photo missing in NCP program banner: रायगड जिल्ह्यातील खासदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. विशेष म्हणजे मंचावर जो बॅनर लावला होता. त्यामध्ये सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो होते.

या बॅनवर दिवंगत अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नव्हते. त्यामुळे तटकरे कुटुंबावर टीका करण्यात येत होती. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता या बॅनरबाबत तटकरे कुटुंबातून मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, 'स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.'

Aditi Tatkare reacts to controversy over missing photos of Ajit Pawar and Sunetra Pawar on a political banner
Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

'अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले.'

'हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच.', असे देखील आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

Aditi Tatkare reacts to controversy over missing photos of Ajit Pawar and Sunetra Pawar on a political banner
Sunil Tatkare News : सुनील तटकरेंच्या कार्यक्रमातील बॅनरवरून अजितदादा, सुनेत्रा पवारांचे फोटो गायब; राष्ट्रवादीत राडा, वाद पेटला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com