Ahilyanagar ACB News: इकडे कुठे? म्हणत ACBला चकवायचा प्रयत्न फसला! आठ वर्षांत दुसऱ्यांदा सापडला

Ahilyanagar ACB Action: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर पथकाच्या कार्यालया शेजारील तोफखाना पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिसावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar ACB News
Ahilyanagar ACB NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं अहिल्यानगरमधील पथकानं त्यांच्याच शेजारी असलेल्या तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 35 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. अनिल आजिनाथ गोसावी या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईच्या काही वेळेपूर्वीच लाचलुचपतच्या पथकातील एक कर्मचारी अनिल गोसावीला तोफखाना पोलिस ठाण्यात क्राॅस झाला होता. त्यावेळी गोसावीनं त्याला 'इकडे कुठे?' असा प्रश्न केला होता. यानंतर काही वेळातच अनिल गोसावीविरुद्ध कारवाई झाली. गेल्या आठ वर्षांत या कर्मचाऱ्यावर दुसऱ्यांदा ही कारवाई झाली आहे. यापूर्वी 2019 मध्ये लाचेचा गुन्हा दाखल झाल होता.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीला चौकशीसाठी तोफखाना पोलिसांकडून बोलवण्यात येत होते. आरोपीला दाखल गु्न्ह्यात मदत करण्यासाठी कर्मचारी अनिल गोसावी याने सुरवातीला ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

Ahilyanagar ACB News
Bhondubaba In Mumbai: बकऱ्याचा कलेजा, स्मशान राख अन् दारूची बाटली; आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप! आजार दूर करण्याचा दावा

आरोपी तक्रारदाराला गुन्ह्यात मदत अन् चौकशीसाठी वारंवार पोलिस ठाण्यात येण्याची गरज पडणार नाही, यासाठी अनिल गोसावी याने ही लाच मागितली होती. याबाबत आरोपी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर पथकाकडे तक्रार केली.

लाचलुचपतच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. अनिल गोसावी याने तडजोडीनंतर 35 हजारांची रक्कम स्वीकारण्याची तयारी केली. ही रक्कम तो तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वीकारत होता. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगरच्या पथकाने सापळा लावला होता.

Ahilyanagar ACB News
PMC News: ​पुण्यात गल्लीबोळातील 'नावाच्या' राजकारणाला चाप! प्रशासनाने शोधला 'जालीम' उपाय

लाचखोर पोलिसाचा प्रश्न अन् कारवाई

लाचलुचपतच्या पथकातील एक कर्मचारी कारवाईपूर्वी लाचखोर पोलिस कर्मचारी अनिल गोसावी याला तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात क्राॅस झाला होता. त्याचवेळी अनिल गोसावी याने त्याला 'इकडे कुठे?', असा प्रश्न केला होता. यानंतर काही वेळातच अनिल गोसावी याला लाच घेताना, पथकाने पकडले.

कोतवालीत 2019मध्ये लाचेत अडकला होता

तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी पथकाने गुन्हा नोंदवला आहे. पथकाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अनिल गोसावी याला यापूर्वी 2019 मध्ये लाचेत कारवाई केली होती. ती कारवाई अहिल्यानगर शहरातीलच कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

पूर्वी पाच हजाराची अन् आता 35 हजारांची लाच....

कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात पाच हजार रुपयांची लाच घेताना, अनिल गोसावी याला पकडण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात अनिल गोसावीला 35 हजार रुपयांची लाच घेताना पथकाने पकडले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com