Waris Pathan : "भाजपमधील काही जण द्वेष पसरवताहेत, त्यांच्यावर कारवाई करा"; AIMIM नं नागपूर हिंसाचाराचे खापर भाजपवर फोडलं

AIMIM On Nagpur Violence : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटल्यानंतर येथे येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून 50 जणांना ताब्यात घेतलं आहे.
AIMIM On Nagpur Violence
AIMIM On Nagpur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनी जमाव पांगवत संचारबंदी लागू केली आहे. येथील रस्तेही बंद करण्याचे आदेश पोलिस नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिले आहेत. सध्या येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावरून एआयएमआयएमने भाजपवर टीका केली असून जूना इतिहास उखरून काढला जातोय. लोकांचे लक्ष विचलीत केलं जातयं असा आरोप केला आहे.

औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली आणि हिंसाचार भडकला. ज्यात दगडफेक आणि जाळपोळ समाजकंटकांनी केली. यामुळे येथील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आतापर्यंत जवळपास 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर येथील रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

यावरून एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या हिंसाचाराचा आम्ही निषेध करत असून याच काय तर अशा घटनांचा आम्ही निषेध करत असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने असा हिंसाचार का घडला याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

AIMIM On Nagpur Violence
Waris Pathan: एमआयएमच्या माजी आमदाराला पोलिसांनी रोखलं; 'मला कुठेही जाण्याचा अधिकार...'

याचबरोबर वारिस पठाण यांनी, भाजपमधीलच काही लोक द्वेष पसरवत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी केली आहे. तर भाजप 400 वर्षे जुन्या औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित करून लक्ष विचलित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

AIMIM On Nagpur Violence
Sajid Pathan: साजिद पठाण यांची आमदारकी धोक्यात? भाजपच्या पराभूत उमेदवाराने खेचले न्यायालयात

दरम्यान या घटनेवरून भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी या मोठा खुलासा करताना दावा केला आहे. दटके यांनी, बाहेरुन आलेल्या काही व्यक्तींनी घरांना आणि वाहनांना आग लावली. सकाळी याविरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण रात्री महल परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com