Union Budget 2025 : 'शेतीसाठी नव्हे तर उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ देणाऱ्या घोषणा?' नवले यांचे टीकास्त्र

Ajit Navale On Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याऱ्या घोषणा केल्याचे आता सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणत आहेत. पण त्या घोषणा सर्वसामान्यच काय तर शेती आणि शेतकरी यांची दिशाभूल करणाऱ्या असल्याची आता टीका होत आहे.
Ajit Navale On Union Budget 2025
Ajit Navale On Union Budget 2025
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता. 1) अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी, अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिले. या अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या प्रत्यक्षात मात्र उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या असल्याचा घणाघाती आरोप किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असती तर ती खऱ्या अर्थानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरली असती. प्रत्यक्षात मात्र टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तरतूद करण्यात आली आहे व त्यामुळे अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचं भलं होणार असल्याचे भासवलं जातय असे नवले यांनी म्हटलं आहे.

आसाममध्ये युरिया प्लांट सुरू करून खतांबद्दल विशेषता युरियाबद्दल आत्मनिर्भर होण्याच्या बाबत पाऊल टाकल्याचं जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खतांवरची सबसिडीला कात्री लावली जातेय. परिणामी खतांचे भाव आणि शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून शेती तोट्यात जात आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुदानाच्या माध्यमातून खतांच्या किमती कमी करणे आवश्यक होते. ते मात्र पुरेशा प्रमाणामध्ये झालेले दिसत नसल्याचा दावा नवले यांनी केला आहे.

तसेच नवले यांनी, तेलबिया आणि डाळी बद्दल घोषणा करण्यात आली असली तरी मागील अनुभव पाहता, जोपर्यंत तेलबिया व डाळ पिकांना रास्त भावाची हमी मिळत नाही व त्यासाठी सरकारी खरेदी यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत या घोषणांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कोणताही लाभ होणार नाही, असे म्हटलं आहे.

Ajit Navale On Union Budget 2025
Union Budget 2025 : बजेट उघडताच शेतकऱ्यांसाठी खास घोषणा, नवी धनधान्य योजना; बिहारसाठी विशेष बोर्ड

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. किसान सभा व शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. केंद्र सरकार मात्र जाहीर न करता कॉर्पोरेट कंपन्यांची कोट्यावधींची कर्ज माफ करत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल मात्र एक शब्द सुद्धा उच्चारण्याची तसदी सरकारच्या वतीने घेतली जात नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी बद्दल काही पावले टाकली जातील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नसल्याचा दावा नवले यांनी केला आहे.

Ajit Navale On Union Budget 2025
Union Budget 2025 : मोदी सरकारसाठी महिला 'लाडक्या', बजेटमध्ये दिलं मोठं गिफ्ट!

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना रास्त भरपाई मिळावी यासाठी पिक विमा योजना राबवली जाते. प्रत्यक्षात मात्र या योजनेचा लाभ विमा कंपन्या व भ्रष्ट नेते घेताना दिसतात. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून याबाबत बदल करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना रास्त मदत मिळण्याबद्दल पावले टाकण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने अर्थसंकल्पात तसे झालेले दिसत नाही, असे म्हणत नवले यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com