Ajit Pawar On Walmiki Karad : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? अजित पवारांनी सत्य काय ते एका वाक्यात सांगितलं; म्हणाले...

Ajit Pawar Suspended PSI Ranjit Kasale Walmiki Karad : रणजित कासले याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सांगितले होते की, वाल्मिक कराडच्या एन्काऊंचरसाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यासाठी पाच, 50 कोटीची ऑफर देखील मला देण्यात आली होती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटक करण्याचा प्लॅन होता. त्यासाठी आपल्याला विचारणा करण्यात आली होती, असा दावा केला आहे. कासले याचा हा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावार व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर यामध्ये किती तथ्य आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

मीडियाशी संवाद साधताना अजित पवारांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर विषयी विचारले असता ते म्हणाले, 'मला याबाबत काही माहिती नाही. निलंबित असलेल्या अधिकाऱ्याचे म्हणणे किती मनावर घ्यायचे हे ठरवायला हवे.'

रणजित कासले याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सांगितले होते की, वाल्मिक कराडच्या एन्काऊंचरसाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यासाठी पाच, 50 कोटीची ऑफर देखील मला देण्यात आली होती. मात्र, हे पाप माझ्याकडून होणार नाही, असे सांगितले होते. मला जेव्हा ही ऑफर देताना आली तेव्हा मी सायबर विभागात होतो मात्र अशा कामासाठी दुसऱ्या विभागातूनही बोलवले जाते असे कासले यांनी व्हिडिओतून सांगितले होते.

Ajit Pawar
Ranjit Kasle News : चक्र फिरली; पकडून दाखविण्याचे चॅलेंज देणारा कासले पोलिसांना शरण येणार, गुपित उलगडणार...

पोलिसांना जाणार शरण...

धनंजय मुंडेंलाच वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता, असा दावा देखील कासले याने केले होता. या दाव्यासोबत पोलिसांनी आपल्याला पकडून दाखवावे असे चॅलेंज देखील त्याने केले होते. मात्र त्याचा नवा व्हिडिओ समोर आला असून आता पळून उपयोग नाही.मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतल्याचे कासले याने त्यात म्हटले आहे.

का झाले होते कासलेची निलंबन?

बीड पोलिस दलात कार्यरत असताना रणजित कासले याने गुजरातमध्ये जाऊन एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा खातेअंतर्गत तपास करून विनापरवानी गुजरातमध्ये गेलेल्या रणजित कासले याचे बीड पोलिस आयुक्तांनी निलंबन केले होते.

Ajit Pawar
China-India Relation : ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बनंतर चीनला आठवला भारत; येणं-जाणं केलं सोपं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com