Ajit Pawar Plane Crash : पोस्ट आधी, घटना नंतर! अजित पवारांच्या मृत्यूपूर्वीची भाजप समर्थक ट्रोलरची ‘हादरा’ पोस्ट चर्चेत; रोहित पवारांचा भाजप-फडणवीसांवर निशाणा

Rohit Pawar Press Conference 3.0 on Ajit Pawar Plane Crash : रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आज (ता.१८) पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत शंका उपस्थित केली आहे.
Rohit Pawar Press Conference 3.0 on Ajit Pawar Plane Crash
Rohit Pawar Press Conference 3.0 on Ajit Pawar Plane Crashsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

  2. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत समित ठक्कर यांच्या ट्विटचा उल्लेख करत गंभीर आरोप केले.

  3. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Rohit Pawar Allegations News : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे निधन विमान अपघातात झाले. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराच्यास दरम्यान २८ जानेवारी रोजी बारामती विमान तळावर विमानाचा अपघात झाला आणि त्यांच्यासह पाच जणांना मृत्यू झाला. या मृत्यूनंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना विमान अपघात संशय व्यक्त केला. दरम्यान मंगळवारी (ता.१७) विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आली ज्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर गंभीर आरोप करत अनेक शंका उपस्थित केल्या. यावेळीच त्यांनी समित ठक्कर नावाच्या व्यक्तीचे नाव घेत मोठा आरोप केला. तसेच दांदाच्या विमान अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे समित ठक्करने ट्विट केले आणि ते अवघ्या ७ मिनिटांत डिलिट केले. आता तोच मला ट्रोल करत आहे. हा भाजपचा ट्रोलर असून त्याला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे असे म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, ही घटना अपघात होती का घातपात याबद्दल विविध चर्चा सुरू असतानाच रोहित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले. त्यांनी दादांच्या अपघाताला आज २२ वा दिवस असतानाही काहीतरी द्यायचं म्हणून फालतू समोर आणलं जात आहे. पण यातही त्यांनी मॉडेल चुकवलं. मग हे काय आहे. याला काय म्हणायचं? दादाचं एवढं महत्त्व नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar Press Conference 3.0 on Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट; तटकरे-पटेल यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय आहे 'त्या' पत्रात?

जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे त्या लोकांनी सत्येचा आणि ताकदीचा वापर करून वेगाने चौकशी का केली नाही. तसे का प्रयत्न केले नाहीत असाही सवाल केला आहे. तर प्राथमिक अहवाल यायला एवढा वेळ का लागतो? कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, सत्ता नसलेला माणूस इतकी माहिती काढू शकतो, तर तुम्ही २२ दिवस लावताय. तपास पुढे जात नाही याचं काय कारण आहे? कारण व्हीएसआर कंपनी अडचणीत येऊ नये म्हणून कागदपत्र बनवले जात आहेत, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोकं किंवा डोकं होतं त्याला वाचवण्याचे काम ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतेय का? असा गंभीर आरोप केला आहे.

याच दरम्यान त्यांनी, त्यांना ट्रोल करणाऱ्या समित ठक्करचे नाव घेत गंभीर आरोप केला आहे. याच समित ठक्करने दांदाच्या विमान अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे ट्विट केले होते. जे त्याने अवघ्या ७ मिनिटांत डिलिट केले. आता तोच आपल्याला ट्रोल करत आहे. हा भाजपचा ट्रोलर असून त्याच्या अशा वागण्याने राज्यातील जनतेला वेगळीच शंका येत आहे.

हा समित ठक्कर, मी एका सेलिब्रिटी खेळाडू सोबत केलेल्या विमान प्रवासावरून ट्रोल करत आहे. मला विचारतोय की, तू प्रवास करताना तुला कळलं नव्हतं का? म्हणजे माझा आणि त्या क्रिकेटपटूचाही अपघात व्हावा अशीच त्याची अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास ट्रोलर पैसे घेवून काम अभ्यास न करताच भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे काम करतात. कदाचित याची माहिती देवेंद्र फडणवीस नसावी यांना नसावी. पण आता लोकांना प्रश्न पडत आहेत की भाजपचे ट्रोलर मला का ट्रोल करत आहेत? याने पोस्ट टाकली की पैसे घेऊन काम करणारे रिट्वीट करतात", यामुळे राज्याच्या जनतेला आता वेगळीच शंका येत आहे.

हे लोक मला वेडं ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी समित ठक्करला सोडणार नाही, त्याची माहिती काढणार. याला पैसे घेऊन काम करण्याचं वेड असेल पण मला माझ्या दादाला, काकाला काय झालं हे शोधण्याचं लागलं आहे. हो प्रेमापोटी मला वेड लागलं आहे. तुम्हाला हवा तेवढा पैसा वापरा. माझे आजोबा फार मोठे आहेत, काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. या अपघाताची चौकशीची मागणी महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक करत आहेत.

असे ठक्करसारखे चिरकूट पैसे देऊन काम करतात. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. हे सगळे अहिल्यानगरचे असून, भाजपाचे ट्रोलर्स आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. अशी कोणती ताकद आहे जी आम्ही प्रवास करताना प्रशासनाकडे दिलेली खासगी माहिती या ट्रोलर्सकडे जाते. त्यांना ती कोण देत? जी आम्ही विश्वासानं प्रशासनाकडे देतो. याची जरा लाज वाटली पाहिजे असे म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rohit Pawar Press Conference 3.0 on Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला? रोहित पवारांनी सांगितलं धक्कादायक कारण! मांडला नवा पुरावा

FAQs :

1. रोहित पवारांनी कोणते आरोप केले?
त्यांनी विमान अपघाताआधी केलेल्या कथित ट्विटचा उल्लेख करत समित ठक्कर यांच्यावर गंभीर संशय व्यक्त केला.

2. ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती कोणी दिली?
विमान अपघात तपासात ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

3. समित ठक्कर प्रकरण काय आहे?
अपघाताच्या दोन दिवस आधी राजकीय भूकंप होईल असे ट्विट करून ते काही मिनिटांत डिलिट केल्याचा आरोप आहे.

4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय आहे?
या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

5. पुढील तपास प्रक्रिया काय असू शकते?
तपास यंत्रणा ब्लॅक बॉक्स डेटा, सोशल मीडिया पुरावे आणि तांत्रिक अहवालांचा अभ्यास करून निष्कर्ष काढतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com