Muffler Leader : अजितदादांच्या अपघातामागचा 'मफलरवाला' नेता कोण? चव्हाण सेंटरबाहेर बॅनर झळकले; 16 नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट?

A mystery banner outside Yashwantrao Chavan Centre raises questions over Ajit Pawar plane crash. Who 'Muffler Leader'? What planned November 16? अजित पवार यांच्या विमान अपघातातील घातपाताच्या संशयावरून राजकीय वातावरण तापले; 'नेत्याला कोण वाचवतंय?' असा बॅनरवर सवाल, 15 नोव्हेंबरच्या प्रेझेंटेशननंतर दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाकडे लक्ष.
Muffler Leader
Muffler LeaderSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar death investigation : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आणि त्यामागील घातपाताच्या संशयावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘अजितदादांच्या अपघात-घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?’ असा थेट सवाल या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोस्टरवर मफलरची प्रतिकृती दाखवण्यात आली असून, 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता याच ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बॅनरवर कोणत्याही राजकीय (Maharashtra Politics) नेत्याचे नाव किंवा आयोजकांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बॅनर कोणी छापून घेतले हे गुलदस्त्यात आहे. तसेच हा इशारा नेमका कोणाला उद्देशून आहे आणि 16 नोव्हेंबरला कोणता राजकीय खुलासा होणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

या पोस्टरवरील मफलरच्या प्रतिकृतीमुळे नेमका नेता कोण, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवणारा एक मोठा नेता आरोप करण्यात आला होता. या नेत्याचा उल्लेख ‘मफलरवाला नेता’ असा करण्यात आला होता. संबंधित नेत्याचे नाव आणि त्याबाबतचे पुरावे योग्य वेळी समोर आणणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सांगण्यात आले होते.

Muffler Leader
NCP merger : विलीनीकरणाचा खेळ हास्यास्पद! संजय राऊतांचा शरद पवारांना थेट इशारा; म्हणाले, 'मंत्रीपदासाठी हपापलेले...'

मात्र, यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेले पोस्टर कोणत्या नेत्याने अथवा पक्षाने लावले आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोस्टरवरील मफलरचा संदर्भ आणि उलटसुलट विधानांचा संबंध सध्या चर्चेचा विषय आहे. याशिवाय 15 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने एक प्रेझेंटेशन होणार आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 16 नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही घडामोडींचा परस्पर संबंध आहे का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Muffler Leader
NCP Merger : अजितदादांसमोरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा 45 मिनिटे खल; जयंत पाटलांचा 'तो' प्रश्न काय होता? भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

28 जानेवारी 2026रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर विमानाची देखभाल, वैमानिकांची नियुक्ती, उड्डाणाशी संबंधित तांत्रिक बाबी आणि विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

तपासी यंत्रणा काहीच सांगेना...

या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त करत स्वतंत्र आणि सखोल तपासाची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र सीआयडी अपघातामागे घातपात, गुन्हेगारी निष्काळजीपणा किंवा अन्य कारण आहे का, याचा तपास करत असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. विमान अपघाताच्या तांत्रिक कारणांचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. अद्याप तपास यंत्रणांनी हा अपघात-घातपात असल्याचे जाहीर केलेले नाही.

'मफलर'ची प्रतिकृती अन् राजकीय चर्चा

पोस्टरवरील प्रश्न, मफलरची प्रतिकृती आणि ठरावीक तारीख आणि वेळ यामुळे या प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा वेळी एखाद्या नेत्याला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करणारे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना आणखी धार चढली आहे.

16 नोव्हेंबर का महत्त्वाची?

मात्र, पोस्टरमागील व्यक्ती किंवा संघटना कोणती, 16 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचे स्वरूप काय आणि त्यातून कोणते पुरावे समोर येणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. त्यामुळे 16 नोव्हेंबरला होणारा खुलासा केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित राहणार की अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला नवी दिशा देणारी माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.