Amit Shah Mumbai visit: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी; अमित शाह अन् एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा, एकाच गाडीतून प्रवास, नेमकं काय घडलं?

Amit Shah Mumbai visit News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांची रविवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी या दोन नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली असल्याचे समजते.
Amit Shah, Eknath Shinde
Amit Shah, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. उद्यापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत असतानाच रविवारपासून दिन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांची रविवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी या दोन नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली असल्याचे समजते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी अमित शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तब्बल अर्धा तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच लंडन दौरा झाला. या दौऱ्यावेळी त्यांनी घेतलेल्या भेटीविषयीची माहिती त्यांनी दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये गांभीर्याने विचारमंथन झाले. या भेटीनंतर, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी एशियाटिक लायब्ररीच्या दिशेने प्रवास केला. या प्रवासादरम्यानही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरूच होती.

Amit Shah, Eknath Shinde
Eknath Shinde : काँग्रेस सोडलेला बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट; भाजपच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढणार?

ही भेट राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या चर्चेचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या फोर्टमधील दी एशियाटिक सोयायटीला अमित शहा यांनी भेट दिली.

Amit Shah, Eknath Shinde
Devendra Fadnavis : CM फडणवीस अचानक नागपूरवरून थेट दिल्लीत; हायकमांडसोबत खलबतं; नेमकं कारण काय?

त्यानंतर एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com