

Amol Kolhe News : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ‘ऑफर आली तर विचार करेन’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्या या एका वाक्यानंतर 'ऑपरेशन तुतारी'ची चर्चा राज्यभर रंगली. मात्र, आता स्वतः अमोल कोल्हेंनी यावर काय स्पष्टीकरण दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, 'हे विधान भाजप प्रवेशाबद्दल नव्हतंच. पत्रकारांनी मला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता की, 'भाजपमध्ये गेल्याशिवाय हा प्रकल्प होणार नाही का?' का? त्याला मी प्रतिप्रश्न केला होता की अशा काही ऑफर आहे का? जर रेल्वे प्रकल्पासाठी ऑफर आली, तर विचार करू. म्हणजेच, विचार करण्याची तयारी पक्षांतरासाठी नव्हती. तर मतदारसंघाच्या विकासासाठी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आहे, एकत्र राहील. शरद पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. सुप्रिया सुळे आमच्या गटनेत्या आहेत.आणि आम्ही सर्व आठ खासदार शरद पवार साहेबांसोबत ठामपणे उभे आहोत."
संजय राऊत यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही 'ऑपरेशन तुतारी'च्या चर्चा फेटाळल्या. ते म्हणाले की, "अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत आणि शरद पवार साहेबांसोबतच राहणार आहोत."
बुधवारी माध्यमांशी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीसुद्धा ऑपरेशन तुतारी हे कधीही होणार नाही. आम्ही सर्व खासदार एकसंघ आहोत असे सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.