Aniket Tatkare Meet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा अनिकेत तटकरेंना आशीर्वाद; कोकणातून पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा

MLC Election Raigad : रायगडची विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
 Aniket Tatkare Sunil Tatkare Meet Eknath Shinde
Aniket Tatkare Sunil Tatkare Meet Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

MLC Election : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रायगडच्य जागेवरून रस्सीखेच सुरू होती. अखेर ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुत्रे अनिकेत तटकरे हे येथून उमेदवार असतील.

आपली उमेदवारी पक्की झाल्यानंतर अनिकेत तटकरे आपले वडील सुनील तटकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीविषयी माहिती देताना अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी साहेबांचे मार्गदर्शन लाभले तसेच आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले.

जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.यावेळी साहेबांचे मार्गदर्शन लाभले तसेच आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, अशा भावना देखील अनिकेत यांनी व्यक्त केल्या.

 Aniket Tatkare Sunil Tatkare Meet Eknath Shinde
Nagaradhyaksha Election : कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीने उधळला गुलाल; सुनील तटकरेंच्या मास्टरस्ट्रोकने फिरला गेम

एकनाथ शिंदेंचे आशीर्वाद

रायगडच्या जागेसाठी शिवसेनेतून मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी हे आग्रही होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याचे निश्चित झाले आहे. महेंद्र दळवी यांच्या मुलीने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचे आशीर्वाद हे अनिकेत तटकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. या भेटीमध्ये शिंदे यांनी अनिकेत यांच्या खांद्यावर हात ठेऊन काढलेल्या फोटोमुळे शिंदे यांचा अनिकेत तटकरेंना पाठींबा असल्याचा मेसेज शिवसैनिकांध्ये गेल्याचे सांगितले जात आहे.

 Aniket Tatkare Sunil Tatkare Meet Eknath Shinde
Raigad MLC Election : शिवसेनेने अचूक टायमिंग साधलं! रायगड विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडणार, पण बदल्यात केली मोठी राजकीय डील...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com