Raigad MLC Election : शिवसेनेने अचूक टायमिंग साधलं! रायगड विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडणार, पण बदल्यात केली मोठी राजकीय डील...

Raigad MLC Shivsena NCP Deal : शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या या डीलमुळे अनिकेत तटकरे यांच्या विधानपरिषद उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.
Eknath Shinde, Sunil Tatkare
NCP leader Sunil Tatkare’s son Aniket Tatkare is likely to get a clear path for the Raigad MLC Election after the Shiv Sena-NCP agreement over the seat-sharing formula.Sarkarnama
Published on
Updated on

Raigad MLC Election : राज्यभरात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळत आहे. याच निवडणुकीत रायगड विधानपरिषदेच्या जागेची जोरदार चर्चा सुरू आहे.

कारण, या जागेवर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. अशातच आता या जागेवर तोडगा निघाल्याची माहिती समोर येत असून, ही जागा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, या जागेच्या बदल्यात शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेने अचूक टायमिंग साधत, जवळपास सव्वा वर्षांपासून रिक्त असलेले रायगडचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या या डीलमुळे अनिकेत तटकरे यांच्या विधानपरिषद उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.

Eknath Shinde, Sunil Tatkare
Nitin Gadkari : नितीन गडकरींचे नाशिककरांना मोठं गिफ्ट, ठाकरेंच्या खासदाराच्या पाठपुराव्याला यश, तब्बल 220 कोटींचा प्रकल्प मंजूर

शिंदे यांच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांनी या पदावर दावा केला होता. हा वाद टोकाला गेल्याने अखेर हे पद रिक्तच ठेवण्यात आले होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने या वादावर तोडगा काढत शिवसेनेने संधी साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde, Sunil Tatkare
NCP Internal Clash : राष्ट्रवादीच्या बैठकीत 'हायहोल्टेज ड्रामा'; भुजबळ-तटकरेंमध्ये खडाजंगी, पार्थ पवारांचा काढता पाय... वाचा इनसाईड स्टोरी

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या मुलाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या बदल्यात शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे भरत गोगावले विराजमान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com