

New Dehli News : देशातील विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. देशातील तरुण मुले हेच देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे नीट पेपर फुटीबाबत आंदोलन केले जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला सर्वच स्थरातून पाठींबा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? असा सवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठींबा दर्शवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
या पत्रकार परिषदेवेळी अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली. आंदोलकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. चर्चेनंतरच हा प्रश्न सुटणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नीट पेपर फुटीबाबत आंदोलन केले जात असल्याने येत्या काळात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठींबा दर्शवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाबाबत भूमिका मांडली असल्याची माहिती सूत्राने दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.