Asha Bhosle death : अभी ना जाओ छोडकर..! आशा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना गायला लावलं होतं गाणं…

Devendra Fadnavis tribute : आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
Asha Bhosle death
Asha Bhosle deathSarkarnama
Published on
Updated on

Indian music legend death : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहताना एक आठवण सांगितली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियात आशा भोसले यांना श्रध्दांजली अर्पण करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  

Asha Bhosle death
IAS couple in Maharashtra : IAS पत्नीसाठी पतीने बदलले केडर; आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा कारभार या जोडीच्या खांद्यावर...

मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Asha Bhosle death
Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुख्यमंत्र्यांनी गायलं गाणं

जागतिक रेडिओ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील आठवण सांगताना फडणवीस यांनी म्हटले की, अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com