Ashok Kharat : अशोक खरातकडे गर्भपाताच्या गोळ्या, घटस्फोटीत महिलेवर अत्याचार अन्...; 'तो' डाॅक्टर रडारवर

Ashok Kharat Abortion Case Woman : अशोक खरात याने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर ती गर्भवती राहिली असता तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या.
Ashok Kharat faces allegations in connection with an abortion pills case involving a woman.
Ashok Kharat faces allegations in connection with an abortion pills case involving a woman.Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News : भोंदू अशोक खरातच्या आणखी एक कारनामा उघड झाला आहे. महिलेवर अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिली असता तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास देत तिचा गर्भपात घडवून आणला. खरातने महिलेला लग्नाचे अमिष देखील दिले होते. या महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी स्थळ आल्यानंतर संसार सुखाचा होईल का? हे विचारण्यासाठी महिला 2013 मध्ये अशोक खरातकडे गेली होती. त्यानंतर महिलेचे लग्न झाले तिला दोन मुलं देखील झाले. मात्र, नवऱ्यासोबत न पटल्याने तिने घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर ती पुन्हा भोंदू खरातकडे गेली. तेव्हा खरातने घटस्फोट हा तुझ्या नशिबात लिहिलेला होता. मी अवतारी पुरुष आहे. माझे दुसरे लग्न तुझ्यासोबत होणार असल्याचे सांगत तांब्यातील पाणी तिला देत वेळोवेळी अत्याचार केला. ती गर्भवती राहिली असता तिला गोळ्या खाऊ घालून तिच्या गर्भपात घडवून आणला.

खरात विशिष्ट डाॅक्टर अथवा मेडीकल चालकाकडून गर्भपाताच्या गोळ्या घेत होता का? महिलांना तो विशिष्ट एका डाॅक्टरकडे पाठवत होता का? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे खरातला मदत करणारा डाॅक्टर पोलिसांच्या रडारवर आल्याची चर्चा आहे.

Ashok Kharat faces allegations in connection with an abortion pills case involving a woman.
Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर

व्हिडिओ व्हायरल, कारवाई होणार

अशोक खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी 3500 व्हिडिओ लिंक्स सोशल मीडियावरू हटवले आहेत. हे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 100 गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Ashok Kharat faces allegations in connection with an abortion pills case involving a woman.
Ashok Kharat Case : केवळ लैंगिक शोषणच नाही, तर त्यापुढेही खरातचा अघोरीपणा; 'त्या' कृत्यांची हादरवणारी माहिती समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com