Ashok Kharat and Bachchu Kadu : 'तुम्ही भाजपमध्ये....'; बच्चू कडूंना अशोक खरातचा 'तो' सल्ला अन् तेही लगेच पाया पडले, व्हिडिओ आला समोर

Ashok Kharat and Bachchu Kadu Viral Video : पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ज्यामध्ये अशोक खरातने सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिरा दरबार सुरू केला होता. ज्यामध्ये तो ज्योतिष, अंकशास्त्र, पूजाविधीच्या नावाखाली लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत त्यांची आर्थिक फसवणूक करत होता
Ashok Kharat and Bachchu Kadu Video
Viral moment showing Bachchu Kadu at Ashok Kharat’s darbar, highlighting the growing fake baba fraud controversy in Nashik.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 24 Mar : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरात लोकांना कसं फसवायचा आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये कमवायचा हे समोर येत आहे. कधी चिंचोके तर कधी मधाच्या नावाखाली त्याने आपल्या भक्तांची फसवणूक केल्याचं आता उघड झालं आहे.

तर, दुसरीकडे या भोंदू बाबाच्या दरबारात राज्यातील बड्या नेत्यांनी रांगा लावल्याचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर येत आहेत. याच फोटो आणि व्हिडिओमुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

मात्र, हळूहळू या बाबाच्या दर्शनाला गेलेल्या आणखी काही बड्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अशोक खरात कडू यांना "जेंव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेंव्हा इथे या..." असा सल्ला देताना दिसत आहे.

Ashok Kharat and Bachchu Kadu Video
Rupali Chakankar : चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या चाकणकरांच्या मदतीला गणेश मंडळ आलं धावून; बोट कापल्याच्या दाव्याचं खंडण करत 'तो' घटनाक्रमच सांगितला

व्हिडिओत खरात बच्चू कडू यांना नारळ आणि शाल देखील देत आहे. शिवाय बच्चू कडू यांनी खरातच्या पाया पडल्याचंही दिसत आहे. त्यामुळे आता कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ashok Kharat and Bachchu Kadu Video
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

दरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ज्यामध्ये खरातने सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिरा दरबार सुरू केला होता. ज्यामध्ये तो ज्योतिष, अंकशास्त्र, पूजाविधीच्या नावाखाली लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. शिवाय विविध बहाण्यांनी महिलांना एकटे बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचं समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com