Maharashtra CM: काँग्रेसनं शब्द फिरवला..? 'मविआ'तील मुख्यमंत्रिपदाबाबत 'या' नेत्याचं मोठं विधान

Maharashtra Vikas Aghadi CM Role: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
Mahavikas Aaghadi.jpg
Mahavikas Aaghadi.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडुन एकमेकाना लक्ष करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता महाविकास आघाडीत येत्या काळात मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने अनेकदा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील नेत्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही.

यानंतर आता काँग्रेसचे (Congress) नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Mahavikas Aaghadi.jpg
Mahayuti News : भाजपचा 160 जागांवर दावा; महायुतीमध्ये जागावाटपावरून पेच

थोरात म्हणाले, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे अनेकदा बोलून दाखवले होते. एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं होते. त्यामुळे आघाडीत मुख्यमंत्री पदावरून एकमत झाल्याचे दिसत नाही.

Mahavikas Aaghadi.jpg
Pimpri Political News : पिंपरीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा; अजितदादांचा कट्टर समर्थक आमदार अडचणीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com