Eknath Shinde News: शिवसेनेच्या गोटातून सर्वात मोठी अपडेट, एकनाथ शिंदे लवकरच कठोर निर्णय घेणार, तीन ते चार मंत्र्यांना डच्चू?

Shivsena Politics: मंत्री वा आमदारांच्या या अकार्यक्षमतेच्या मोठा फटका बसल्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे लवकरच पक्षात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा समोर येत आहे. त्यामुळे सध्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचीही गच्छंती होणार असल्याचे संकेत दिले जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वीच आपल्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देताना ही त्यांच्यासाठी 'लिटमस टेस्ट' असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांचेबालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित असं मोठं यश न मिळाल्याचं दिसून आलं होतं. याच पार्श्वभूमीवर नाराज शिंदे आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील निवडणुकांचा धुरळा बसताच शिवसेना पक्षात लवकरच पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) महापालिका वा नकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची विविध मंत्र्यांसह आमदारांकडेही विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यात महापालिकेनंतर आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड नसल्याचंच निकालानंतर दिसून आलं.

मंत्री वा आमदारांच्या या अकार्यक्षमतेच्या मोठा फटका बसल्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे लवकरच पक्षात 'भाकरी फिरवण्याच्या' तयारीत असल्याची जोरदार चर्चा समोर येत आहे. त्यामुळे सध्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचीही गच्छंती होणार असल्याचे संकेत दिले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असल्याचं सांगतानाच मंत्रिमंडळातही नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. इतर पक्षातील महत्त्वाच्या अनुभवी नेत्यांचं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होऊन वा संधी असूनही शिवसेनेच्या पदरात फार मोठं काही यश हाती लागलं नाही.

Eknath Shinde
Modi Government New Toll Rule:...तर आता सर्वसामान्य प्रवाशांना टोल भरावा लागणार नाही! मोदी सरकारचा मोठा निर्णय

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीनंतर एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेतानाच पक्षाच्या पुनर्बांधणीच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेलं यश किंवा अपयश यांचा विचार करुन शिवसेना आपली पुढची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जोर लावतानाच शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटनात्मक पदाधिकारी यांना दौरे, भेटीगाठीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा पंचायत समितींच्या निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

Eknath Shinde
Bangladesh Election Result : बांग्लादेशातून मोठी बातमी, निवडणुकीचे निकाल जाहीर, 'बीएनपी'सत्तेत; भारताची डोकेदुखी वाढणार!

याचदरम्यान, एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समोर येत आहे. त्यांच्याजागी लवकरच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आगामीकाळात कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्याच्या कारणांमुळे एकनाथ शिंदे नव्यान पक्षबांधणीसाठी मैदानात उतरण्याची शक्यताआहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com