Bangladesh Election Result : बांग्लादेशातून मोठी बातमी, निवडणुकीचे निकाल जाहीर, 'बीएनपी'सत्तेत; भारताची डोकेदुखी वाढणार!

BNP Wins Tarique Rahman PM : कट्टर इस्लामिक उजव्या विचारणी आणि बांग्ला राष्ट्रवादाची विचारणी असलेला बीएनपी पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results confirm party’s victory and his expected rise as Prime Minister.
BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results confirm party’s victory and his expected rise as Prime Minister.sarkarnama
Published on
Updated on

Bangladesh News : भारताचा शेजारी बांग्लादेशात गुरुवारी (ता.12) निवडणूक पार पडली. तब्बल 300 सदस्य असणाऱ्या बांग्लादेशाच्या संसदेत उजव्या विचारसरणीचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (बीएनपी) बहुमत मिळाले आहे. बीएनपीने तब्बल 200 चे आकडा पार केला आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणे निश्चित आहेत.

शेख हसीना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यांचे नेतृत्व मोहम्मद युनूस यांच्या हाती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये हसीना यांच्या अवामी लीग सहभागी झाली नव्हती.

बीएनपी आणि जमान ए इस्लाम या पक्षांमध्येच मुख्य लढत झाली. मात्र, जे कल हाती येत आहेत त्यानुसार बीएनपी मोठ्या बहुमतांकडे वाटचाल करत असून 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.

बीएनपीचा इतिहास

बीएनपी पक्षाची स्थापना झियाउर रहमान यांनी 1978 मध्ये केली होती. या इस्लामिक कट्टर उजवी विचारसरणी असलेला हा पक्ष आहे. झियाउर रहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपती होते. तर, त्यांची मुलगी खालिदा झिया यांनी पंतप्रधान पद भूषवले आहे. आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे बीएनपीचे नेतृत्व करतात. निवडणुकीत ते ढाका आणि बोगरा या दोन जागांवरून विजय मिळवला आहे.

BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results confirm party’s victory and his expected rise as Prime Minister.
ACB Action : मोठी बातमी! मंत्रालयातच लाचखोरी, एसीबीने रंगेहात पकडले! थेट मंत्र्याला हटवण्याची मागणी, काँग्रेस आक्रमक

भारताची डोकेदुखी वाढणार

बांग्लादेशातील आवामी लीगने नेहमी भारत समर्थक भूमिका घेतली होती. मात्र, बीएनपी हा कट्टर भारत विरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बीएनपी सत्तेत आल्याने भारताची डोखेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results confirm party’s victory and his expected rise as Prime Minister.
Chandrpur Mayor : "बाहेर जा, तुमची गरज नाही" : चंद्रपूरमध्ये भाजप नगरसेवकांच्या 2 गटांत पहिल्याच दिवशी राडा, मुनगंटीवार अन् जोरगेवार समर्थक सभागृहातच भिडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com