Mahayuti sixth seat row: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महायुतीत 'हायव्होल्टेज' ड्रामा; अतिरिक्त मतांमुळे भाजप, एकनाथ शिंदेंच्या सेनेत वाद?

Eknath Shinde claim News : भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 'हायव्होल्टेज' ड्रामा पाहवयास मिळत आहे. दोघांकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील राज्यसभेच्या सात जागासाठी आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यसभेच्या जवळपास सात जागा रिक्त होत आहेत, त्यासाठी विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत आहे. दुसरीकडे मात्र, महायुतीच्या वाट्याला येत असलेल्या सहाव्या जागेवरून सध्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 'हायव्होल्टेज' ड्रामा पाहवयास मिळत आहे. दोघांकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीत एका खासदारासाठी 37 मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यानुसार भाजपकडे अपक्षांसहीत 136 आमदार आहेत. त्यांचे तीन खासदार निवडून येऊन भाजपकडे अधिकची 16 मते आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. त्यांची एक जागा निवडून येऊन 18 अधिकची मते शिल्लक राहत आहेत. त्यामुळे अधिकची उरलेल्या मतावर एक खासदार निवडून सहज येणार आहे. मात्र, आता या जागेसाठी कोण कोणाला पाठिंबा देणार यावरून चुरस पहावयास मिळत आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

भाजपकडे अधिकची १६ मते तर शिवसेनेकडे अधिकची तब्बल 18 मते आहेत. शिवसेना अधिकची 18 मते भाजपला देणार की भाजप अधिकची 16 मते शिवसेनेला देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे येत्या काळात या एका जागेवरून महायुतीमधील भाजप व शिंदेच्या शिवसेनेत चुरस रंगणार आहे. त्यामुळे या जागेवरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळणार आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला एक जागा येणार आहे. दुसरीकडे येत्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रत्येकी एक खासदार निवृत्त होणार आहे. तर चार पैकी महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Congress News : बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लगेच राहुल गांधींचा फोन; मुख्यमंत्र्यांनी थेट घर गाठलं, भाजपमध्ये प्रवेश ठरला...

राज्यातील 'या' सात सदस्यांची जागा होणार रिक्त

राज्यातील भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, धैर्यशील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार, डॉ. फौजिया खान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील या सात सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com