

Maharashtra Home Ministry action : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले नाशिकमधील 'TCS' कंपनीतील धर्मांतर, नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात, नाशिकमधील सातपूर इथला रवींद्र एरंडेचे सेक्स कॅण्डल, अमरावतीमधील परतवाडा इथं अयान मोहम्मद याने अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण प्रकरण आणि मुंबई गोरेगावमधील ड्रग्स प्रकरण गाजत आहे.
यातून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, या सर्व प्रकरणाचा तपास वेगानं व्हावा यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 'अॅक्शन मोड'वर आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रकरणात गंभीर आहेत. तपासात गती यावी, अशी त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी गृहमंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. पोलिस (Police) महासंचालक, अतिरीक्त मुख्य सचिव, 'SIT' प्रमुख बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सर्व प्रकरणात तपास वेगानं करावा, अशी सूचना बैठकीतील अधिकाऱ्यांना केली आहे. याशिवाय तपासात कोणत्याही दबावाला बळी न पडता, कारवाई करावी. कोणी दबाव आणत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधवा, अशा देखील सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.
वरील सर्व प्रकरणांमुळे राज्य सरकार कारभारावर विरोधक तुटून पडले आहेत. टीका होत आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शांतता-सुव्यवस्था या प्रकरणांमुळे धोक्यात आली आहे, अशी टीका करताना विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणांमध्ये महिला, अल्पवयीन युवती आणि तरुणींचं लैंगिक शोषण झालेलं आहे. याच प्रकरणांचा तपास SITकडे असून संथगतीने होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या प्रकरणांच्या तपासात वेगानं होऊ, तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याची तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना, या प्रकरणात बळी किंवा शोषण झालेल्या पीडितांना संपूर्ण विश्वास अन् संरक्षणाची हमी द्या, या प्रकरणात कितीही मोठा व्यक्ती असो, पण तो दोषी असेल, तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल, असा तपास करा, न्यायालयात केस भक्कम उभी राहील, असे पुरावे गोळा करा, तपासात अपराधसिद्धी हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत.
राज्यात धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेणार नाही आणि प्रशासकीय पातळीवर देखील खपवून घेऊ नका, नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. धर्मांतरप्रकरणाचा सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
परतवाडा लैंगिक शोषणात, पीडितांचे समुपदेशन करून, त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास द्यावा. या प्रकणात संबंधित समाजसेवकांची मदत घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबई गोरेगाव ड्रग्सविरोधात मोठ्याप्रमाणात वेगानं कारवाई करा. येणाऱ्या पिढी, तरूणाईच्या भविष्याशी निगडीत बाब असल्याने प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.